एक्स्प्लोर

Ajit Pawar: अजित पवारांचा बारामतीमध्ये 20 हजार मतांनी पराभव; 150 मतदारसंघात गडबड, शरद पवारांच्या पक्षातील आमदाराच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Uttamrao Jankar On Vidhansabha Election: अजित पवार बारामती मतदारसंघात वीस हजार मतांनी पराभूत आहेत, असा दावा शरद पवारांच्या पक्षाच्या आमदाराने केला आहे.

बारामती: महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 150 मतदार संघात गडबड असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर म्हणालेत. तर गडबड असलेल्या मतदारसंघात अजित पवारांचा मतदारसंघ आहे, अजित पवार बारामती मतदारसंघात वीस हजार मतांनी पराभूत आहेत, असा दावा यावेळी उत्तम जानकर यांनी केला आहे, त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत, त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

नेमकं काय म्हणाले उत्तम जानकर 

या सरकारने आत्ता जी विधानसभा निवडणूक घेतलेली आहे, त्यामध्ये जवळजवळ दीडशे मतदार संघामध्ये यांनी गडबड केली आहे. यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत, पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर बारामती मतदारसंघात वीस हजार मतांनी पराभूत आहेत, या मतदारसंघांमध्ये अजित पवार यांनी एक लाख 80 हजार मिळाली आहेत. त्यापैकी एक तृतीयांश प्रपोर्शन इथे देखील लावलेलं होतं, त्यामुळे युगेंद्र पवार यांची मत ऐंशी हजार अधिक साठ हजार अशी एक लाख 40 हजार आहेत. त्यातील 60000 मते वजा होतात, त्यानंतर 1 लाख 20 मतांवरती अजित पवार राहतात. अजित पवार यांचे फक्त 12 आमदार या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि भाजपचे 107 आमदार निवडून आलेले आहेत असं वक्तव्य उत्तमराव जानकर यांनी केले आहे.

त्याचबरोबर आमदार उत्तमराव जानकर यांनी खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत लवकरच निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी आम्ही जाणार असल्याची माहिती बारामतीत माध्यमांशी बोलताना दिली आहे. दिल्लीत आम्ही सगळे मिळून आम्ही निवडणूक आयोगाला भेटणार आहे, असंही ते म्हणालेत. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे 12, तर एकनाथ शिंदे आणि भाजपचे, असे 107 मतदार निवडून आले असल्याचा मोठा दावा देखील त्यांनी यावेळी बोलताना केला आहे. 

बारामतीसह जयकुमार गोरेंच्या मतदारसंघात एकास 5 अशी सेटिंग करण्यात आली होती. त्यांना 1 लाख 3 हजार मते आहेत. त्यांची जवळपास 30 हजार मते विरोधी उमेदवारांची आहे. ते 13 हजार मतांनी पडले आहे. मी या सर्व प्रकरणाचा सखोल अभ्यास करत आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. तर  या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे, तुम्ही द्यायला तयार नसाल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. माझ्या मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली पाहिजे, पुन्हा निवडणूक घेतली पाहिजे असं खुलं आव्हान देखील त्यांनी यावेळी दिलं आहे. 

संतोष देशमुख प्रकरणावर केलं भाष्य

या प्रकरणात दोषी आहेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. यामध्ये वाल्मीक कराड ज्यांच्यासाठी खून करत होता, वाल्मीक कराड यांच्यासाठी खंडणी गोळा करत होता, त्याच्यासाठी हा मलिदा गोळा करत होता, तो कोण आहे त्याला देखील शिक्षा झाली पाहिजे. 
इतकं सगळं करण्यामागे कारणच इतकं होतं कोणालातरी नेवून द्यायचं, या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला, त्याला माझाही पाठिंबा आहे. त्याच्या पुढच्या लढाईमध्ये देखील मी त्यांच्यासोबत असेल. वाल्मीक कराड याला अटक करावी, त्याला तात्काळ अटक झाली नाही, तर या राज्यांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघतील असंही पुढे उत्तमराव जानकर म्हणालेत. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पिंपरी चिंचवडमधील 52 कोटींचं भ्रष्टाचार प्रकरण! शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादीचे खळबळजनक आरोप
पिंपरी चिंचवडमधील 52 कोटींचं भ्रष्टाचार प्रकरण! शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादीचे खळबळजनक आरोप
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
पार्थ पवारांच्या विनंतीनंतर अर्ज माघारी घेणार होते, पण धनंजय मुंडेंची पोस्ट बघून लढण्याचा निर्णय घेतला : करुणा शर्मा
पार्थ पवारांच्या विनंतीनंतर अर्ज माघारी घेणार होते, पण धनंजय मुंडेंची पोस्ट बघून लढण्याचा निर्णय घेतला : करुणा शर्मा
Pune Crime News: प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने सहा वर्षाच्या मुलाला संपवलं, प्रियकराच्या साथीने बनावही रचला, पण आजोबांमुळे फुटलं प्रकरणाचं बिंग, नेमकं काय घडलं?
प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने सहा वर्षाच्या मुलाला संपवलं, प्रियकराच्या साथीने बनावही रचला, पण आजोबांमुळे फुटलं प्रकरणाचं बिंग, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
Embed widget