एक्स्प्लोर

Ajit Pawar : माणसाच्या मनात जे येतं ते बोलून झाल्यावर मन मोकळं होतं; राजेंद्र पवारांच्या वक्तव्यावर अजितदादा काय म्हणाले?

Ajit Pawar Baramati Speech : भावकी पाठीशी उभी होती म्हणून तू निवडून आला असा टोला अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला होता. त्यावर राजेंद्र पवारांनी प्रत्युत्तर दिलं.

पुणे : आपल्या राजकारणाची सुरूवात कशी झाली याची बारीकसारीक सगळी माहिती आमच्या बंधूंनी दिली, त्या मागची भूमिका काय होती ते माहिती नाही. पण माणसाच्या मनात जे येतं, ते बोलून झाल्यावर मन हलकं होतं असं अजित पवार म्हणाले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ देत अजित पवारांनी हे वक्तव्य केलं.

सांगलीतील एका कार्यक्रमात अजित पवारांनी पुतण्या रोहित पवारांना टोमणा हाणला होता. भावकीचा विचार केला म्हणूनच तू निवडून आला, आपण पोस्टल मतांवर निवडून आलोय हे लक्षात ठेवावं असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर राजेंद्र पवारांनीही प्रत्युत्तर दिलं. काहीजण पोस्टल मतावरती निवडून आले असले तरी काळ आणि वेळ बदलते असं राजेंद्र पवार म्हणाले.

काय म्हणाले राजेंद्र पवार?

राजेंद्र पवार म्हणाले की, "छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सुरुवातीच्या निवडणुकीत वडील माझा विचार करतील असं मला वाटलं होतं. परंतु आमच्या सगळ्या काकांना पुतण्याच दिसतो. तिथेदेखील मला बघितलं नाही त्यावेळी माझ्या वडिलांनी अजितदादांना संधी दिली. मला तिसऱ्यांदा संधी मिळाली पण त्यावेळेस देखील मला सांगितलं गेलं की, सगळ्यांनीच राजकारणात यायचं नसतं. तेव्हा मला त्यांचं बोलणं पटलं, मग मी शांत बसलो. त्यावेळेस मला माहित नव्हतं की, संधी असते त्यावेळेस खेचून घ्यायची असते."

बोलून गेल्यावर मन हलकं होतं

राजेंद्र पवारांच्या या वक्तव्याचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले की, "इंदापूर तालुक्याच्या प्रगतीचा पाया श्री छत्रपती साखर कारखान्याने घातला आहे. त्याची सुरुवात कशी झाली त्या खोलातली जात नाही. कारण आमच्या बंधूंनी पूर्ण बारीकसक संदर्भ सांगितला आहे. त्या मागची भूमिका काय होती माहीत नाही. पण माणसाच्या मनात जे येतं, ते बोलून झाल्यावर माणसाचं मन मोकळं होतं. माझी जून 1984 मध्ये माझी श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना पासून राजकीय सुरवात झाली. काम करत असताना चढ उतार येतात, अडचणीचा काळ आपण पाहिला. याच कारखान्याच्या संचालक पदावरून मी सार्वजनिक जबाबदारी घेतली होती. इथे जादूची कांडी नाही. वेळ लागेल पण आम्ही सर्वजण मजबुतीने उभे आहोत."

काहींनी मला इथल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन होऊ दिलं नाही. म्हणून मी इथला नाद सोडला आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन होऊन दाखवलं. तिथे एक एकर जमीन घेतली, सभासद झालो आणि आता माळेगावचा चेअरमन झालो. आता माळेगाव कारखान्याच्या बरोबरीने छत्रपती कारखान्याने भाव द्यावा असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar Baramati Speech : अजित पवारांचे पूर्ण भाषण

बारामती तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Speech) यांनी थेट शेतकरी (Farmers), साखर कारखाना (Sugar Factory), रस्ते (Road Development) आणि शिक्षण (Education) या महत्त्वाच्या विषयांवर थेट भाष्य केले. त्यांनी कारखान्याच्या संचालक मंडळासाठी निवड करून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आणि गणेशोत्सव (Ganesh Festival) निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छाही दिल्या.

अजित पवारांनी आपल्या भाषणात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) चा वापर वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, "AI मुळे पाण्याची 50% बचत होते आणि शेतकऱ्यांचे उत्पादन (Crop Yield) 40% ने वाढू शकते. ठिबक सिंचन (Drip Irrigation) हा शेतकऱ्यांचा कणा आहे, त्याशिवाय उत्पादन वाढणार नाही."

शिक्षणासाठी मोठा निधी, शाळेच्या इमारतीचे आश्वासन

या आधी शरद पवारांनी डोरलेवाडी येथील रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या इमारतीचा प्रश्न सोडवण्यासाठी 3 कोटी रुपयांचा चेक दिल्याची माहिती अजित पवारांनी सांगितली. 24 वर्ग खोल्या उभारण्यासाठी एकूण 3.60 कोटी रुपये खर्च येणार असून, यात उर्वरित निधी रयत शिक्षण संस्था देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गरज पडली तर मी वैयक्तिक मदत करेन, असे आश्वासनही अजित पवारांनी दिले.

शेतकऱ्यांसाठी रस्ते आणि ऊस हंगामाचा मुद्दा

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील रस्त्यांची दरवस्था पाहता, अजित पवारांनी 10 कोटी रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करत असल्याचे जाहीर केले. डांबरी रस्ता तयार झाल्यानंतर तो कुणी खोदला तर किमान 10 ते 20 हजार रुपयांचा दंड करणार, असा इशाराही त्यांनी दिला.

अजित म्हणाले की, बारामती आणि इंदापूरमध्ये दुधाच्या व्यवसायामुळे आर्थिक सुबत्ता आली आहे. ऊस लागवडीबाबत त्यांनी शेतकऱ्यांना दर तीन वर्षांनी उसाचे बेणे बदलण्याचा सल्ला दिला.

AI तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकऱ्यांसाठी आवाहन

अजित पवार म्हणाले, "राजीव गांधींनी संगणक आणला, त्यावेळी टीका झाली. पण आज संगणकाशिवाय जग शक्य नाही. त्याचप्रमाणे, भविष्यात AI वापरणारा शेतकरीच खरा साक्षर मानला जाईल. त्यामुळे AI चा प्रसार सर्व साखर कारखान्यांत करावा."

ही बातमी वाचा:

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India Squad Against New Zealand: रिंकू सिंग, इशान किशान IN, शुभमन गिल, जितेश शर्मा OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
रिंकू, इशान IN, शुभमन, जितेश OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
Prithviraj Chavan: अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?

व्हिडीओ

T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच
Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Squad Against New Zealand: रिंकू सिंग, इशान किशान IN, शुभमन गिल, जितेश शर्मा OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
रिंकू, इशान IN, शुभमन, जितेश OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
Prithviraj Chavan: अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
Imran Khan: सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
Embed widget