एक्स्प्लोर

Ajit Pawar & Rajendra Pawar: भावकीने लक्ष दिलं म्हणून निवडून आलास, अजितदादांच्या टोमण्याला आता रोहित पवारांच्या वडिलांचं उत्तर, म्हणाले....

Rajendra Pawar speech in Baramati: माझ्या वडिलांनी अजित पवारांना संधी दिली, मला म्हणाले सगळ्यांनी राजकारणात यायचं नसतं; राजेंद्र पवारांनी सांगितला तो किस्सा

Rajendra Pawar and Ajit Pawar: पवार घराण्यात आजवर प्रत्येक काकाने पुतण्याला मदत केली आहे. किंबहुना ती पवार घराण्याची परंपराच आहे, असे वक्तव्य रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी केले. काही दिवसांपूर्वी सांगलीतील एका कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांनी रोहित पवार यांना शा‍ब्दिक चिमटा काढला होता. आपण पोस्टल मतांवर निवडून आलोय, हे लक्षात ठेवावं. भावकीने लक्ष घातलं नसतं तर तू निवडून आला नसता, असा टोला अजित पवार यांनी रोहित पवारांना (Rohit Pawar) लगावला होता. या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी बुधवारी बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले.  यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.  (Baramati News)

सुरुवातीच्या काळात अजित पवार ज्यावेळी निवडणूक लढले होते तेव्हा माझ्या वडिलांनी म्हणजे आप्पासाहेबांनी त्यांना मदत केली होती. नवख्या माणसाला किती मतदान पडतं आपल्याला माहिती आहे. परंतु, त्यानंतर अजित पवार यांनी 35 वर्षे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्त्व केले. काहीजण पोस्टल मतावरती निवडून आले असले तरी काळ आणि वेळ बदलते, असे राजेंद्र पवार यांनी म्हटले. 

छत्रपती सहकारी साखर कारखान्याला निवडणुकीत वडील माझा विचार करतील असं मला वाटलं होतं. परंतु आमच्या सगळ्या काकांना पुतण्याच दिसतो. तिथेदेखील मला बघितलं नाही त्यावेळी माझ्या वडिलांनी अजितदादांना संधी दिली. मला तिसऱ्यांदा संधी मिळाली पण त्यावेळेस देखील मला सांगितलं गेलं की, सगळ्यांनीच राजकारणात यायचं नसतं. तेव्हा मला त्यांचं बोलणं पटलं,  मग मी शांत बसलो. त्यावेळेस मला माहित नव्हतं की, संधी असते त्यावेळेस खेचून घ्यायची असते. मला कारखान्याला संधी दिली नाही. त्यानंतर वाटलं असेल की हा कारखाने काढेल. जळगावला काढेल, नगरला काढेल, मराठवाड्यात काढेल, बारामतीच्या आसपास काढेल आणि त्यामुळे माझ्या काकांनी मला संधी दिली नाही आणि मी आता इथे तुम्हाला एआय तंत्रज्ञान काय आहे सांगायला उभा राहिलो आहे. भविष्यात एआय तंत्रज्ञानाशिवाय गत्यंतर नाही. 

अख्ख्या राज्याला किस्सा माहिती आहे आम्ही गाई आणायला गेलो, त्यावेळी अजितदादा केबिनमध्ये बसले आणि मी पाठीमागे गाईच्या शेपटाजवळ बसलो. दादा पुढच्या केबिनमधून पुढच्या केबिनमध्ये, पुढच्या केबिनमध्ये, पुढच्या केबिनमध्ये गेले, मात्र आम्ही तिथेच मागे राहिलो. दादांना गायींचा व्यवसाय चांगला जमायचा. माझी गाय तीन हजाराला गेली की दादांची गाय नऊ हजाराला जायची, असे राजेंद्र पवार यांनी म्हटले.

Rajendra Pawar speech in Baramati: एआय साखर उद्योगाचं भविष्य बदलेल, शेतकऱ्यांनी सबसिडीवर अवलंबून राहू नये: राजेंद्र पवार

संघटनावाल्यांना मला काय म्हणायचं नाही. त्यांचे ते काम करतात. पण मला तरी वाटत नाही की, शेतमालाचा भाव वाढेल. स्वस्तवाल्यांना जास्त लोक मतदान करतात, सरकार आयुष्यात ठोस निर्णय घेऊ शकत नाही. पाणी जर जास्त दिलं तर पुढच्या पिढीला जमिनी राहणार नाहीत. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव एवढा असेल की, पुढच्या आठ दहा वर्षात शाळेत शिकवायला शिक्षक नसतील, गाडी चालवायला ड्रायव्हर नसतील. 2040 मध्ये मेंदूदेखील बदलला जाणार आहे. त्यामुळे राजकारण देखील तसेच असणार आहे. भरणे मामा त्या काळात आम्ही नसतो, तुम्हाला संधी आहे, अशी टिप्पणी राजेंद्र पवार यांनी केली.

इथे राज्यकर्ते स्टेजवर आहेत मला कोणाला नावे ठेवायची नाहीत. माळेगाव मध्यवर्ती संशोधन केंद्राने 265 सारखी उसाची जात काढून टनाटनाने महाराष्ट्राचे साखर वाढवली. पण त्या पाडेगाव संशोधन केंद्राकडे बघायला कोण तयार नाही. विद्यापीठाला नावे ठेवू नका. त्यांना आपल्याला मदत करणे गरजेचे आहे. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते का नाही, हा तुमचा विषय आहे. कृषीमंत्र्यांना मला सांगायचं आहे महाराष्ट्रात एका एका स्क्वेअर फुटाचे देखील मापन झाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी, नागपूर भागात त्याला तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे. सबसिडीसाठी जो थांबतो कधी यशस्वी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सबसिडीसाठी थांबू नका, असे राजेंद्र पवार यांनी सांगितले.

आणखी वाचा

कामं करायची म्हणजे नमतं घ्यावं, आमच्या भावकीलाही घेऊन येत जा; अजित पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

माझ्या नादाला लागू नका! लय चुरूचुरू बोलू नको, भावकीनं लक्ष दिलं म्हणून निवडून आलास, अजितदादांचा रोहितदादाला हसत हसत दम

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Kalate Pimpri Election: राहुल कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर वेगळा विचार करु, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वरिष्ठांना निर्वाणीचा इशारा
राहुल कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर वेगळा विचार करु, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वरिष्ठांना निर्वाणीचा इशारा
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Kalate Pimpri Election: राहुल कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर वेगळा विचार करु, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वरिष्ठांना निर्वाणीचा इशारा
राहुल कलाटेंना पक्षामध्ये घेतलं तर वेगळा विचार करु, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वरिष्ठांना निर्वाणीचा इशारा
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
Payal Gaming Viral Video Controversy: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा? पोस्ट करत म्हणाली...
सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा पायलचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Embed widget