एक्स्प्लोर
परिचारकांचं 'ते' वक्तव्य भाजपच्या सडक्या मनोवृत्तीचं लक्षण : अजित पवार
बारामती : भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपुरात सैनिकांबाबत केलेल्या वक्तव्यावर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. परिचारक यांचं वक्तव्य भाजपच्या सडक्या मनोवृत्तीचं लक्षण आहे, असा घणाघात अजित पवार यांनी केला.
अजित पवार काय म्हणाले?
“आमदार प्रशांत परिचारक यांचं वक्तव्य भाजपच्या सडक्या मनोवृत्तीचं लक्षण असून, महाराष्ट्रातील शूर विरांचा त्यांनी अपमान केला आहे. जनाची नाही तर मनाची काही वाटेना. भाजपचा खऱ्या अर्थाने पापाचा घडा भरला असून, याची शिक्षा भाजपला भोगायला लागणार आहे”, असे अजित पवार म्हणाले.
गिरीश बापट काय म्हणाले?
“आमदार प्रशांत परिचारक हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. ते भाजप पुरस्कृत आहेत. त्यांनी कलेल्या विधानाचे मी समर्थन करणार नाही.”, असे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले.
परिचारकांचं वक्तव्य
”पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सिमेवर लढत असतो. आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो,’’ असं वक्तव्य परिचारक यांनी केलं होतं.
परिचारकांचा माफीनामा
दरम्यान, अनवधानाने माझ्याकडून असं वक्तव्य निघालं, यासाठी मी सर्व सैनिक बांधवांची आणि महिलांची माफी मागतो. कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, तरीही सर्वांची माफी मागतो, असं म्हणत परिचारक यांनी माफी मागितली.
संबंधित बातम्या :
'ते' वक्तव्य अनवधानानं निघालं', परिचारकांचा माफीनामा
आमदार प्रशांत परिचारक यांची प्रचार सभेत जीभ घसरली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement