![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mahayuti Crisis: शिवसेनेच्या कार्यक्रमाला अजितदादांची पाठ, मग जिल्हाप्रमुखानेही फोटोवर काळं कापड टाकलं; बारामतीमध्ये महायुतीत मिठाचा खडा?
Mahayuti Crisis: बारामतीत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, त्याचे मोठमोठे बॅनर, कमानी शहरात लावल्या मात्र अजित पवारांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पाठ फिरवली.
![Mahayuti Crisis: शिवसेनेच्या कार्यक्रमाला अजितदादांची पाठ, मग जिल्हाप्रमुखानेही फोटोवर काळं कापड टाकलं; बारामतीमध्ये महायुतीत मिठाचा खडा? Ajit Pawar absence to ganesh festival in the name of chief minister Eknath shinde in baramati district head threw a black cloth over Pawar photo Mahayuti Crisis: शिवसेनेच्या कार्यक्रमाला अजितदादांची पाठ, मग जिल्हाप्रमुखानेही फोटोवर काळं कापड टाकलं; बारामतीमध्ये महायुतीत मिठाचा खडा?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/10/4541864d7caecdf7886946389f80abb317259542019041075_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: मागील काही दिवसांपासून महायुतीतील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीशी धुसफूस किंवा संघर्ष दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी बारामती शहरात लावलेल्या बॅनरवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांना (Ajit Pawar) वगळण्यात आलं होतं, त्याचबरोबर अजित पवारांकडून जनसन्मान यात्रेमध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला जातो मात्र, त्यात मुख्यमंत्री हा शब्द वगळला जातो, त्यावरून देखील धुसफूस सुरू होती. त्यानंतर आता बारामतीत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, त्याचे मोठमोठे बॅनर, कमानी शहरात लावल्या मात्र अजित पवारांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पाठ फिरवली त्यानंतर अजित पवारांच्या (Ajit Pawar) फोटोवरती काळ कापड टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
शिवसेनेच्यावतीने एकनाथ गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाच्या कमानी बारामती शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. बारामती शिवसेनेच्या वतीने एकनाथ महोत्सवाचा आयोजन करण्यात आले परंतु याच्या उद्घाटनाला अजित पवार (Ajit Pawar)न आल्याने शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटो वरती काळ कापड टाकल्याने पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलेलं आहे.
यावेळी पोलीस आणि सुरेंद्र जेवरे यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली. सुरेंद्र जेवरे हे शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. अजित पवारांना तीन ते चार वेळा कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली परंतु अजित पवारांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवली. अजित पवारांच्या कुटुंबाला देखील बोलावलं होतं, परंतु अजित पवारांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणपती मंडळांना भेटी दिल्या तरी अजित पवार एकनाथ फेस्टिवलला आले नसल्याने अजित पवारांच्या फोटोवर काळ कापड टाकलं. अजित पवारांचा निषेध केला त्यानंतर पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतले.
अजित पवारांचा फोटो बॅनरवरून वगळला
बारामतीतल्या मेदडमध्ये देवा भाऊ लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला अशा आशयाचा फलक बारामतीत लागला आहे. फ्लेक्सवर महापुरुषांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा फोटो या फ्लेक्स वरून गायब आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बारामती जनसन्मान रॅली पार पडली. त्यावेळी फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्या बॅनर वरती फोटो लागले होते. म्हणून भाजपने लावलेल्या बॅनर वरती उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो लावण्यात आला नसल्याची बारामती जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यात मोरगाव रस्त्यावर एका होर्डींगवर देवाभाऊंचा फ्लेक्स लावण्यात आला आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री शिंदे यांनाही स्थान देण्यात आले आहे. शिवाय महापुरुषांचे फोटो देखील त्यावर लावण्यात आले आहेत. मात्र. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फोटोला फ्लेक्सवर स्थान देण्यात आलेले नाही. त्यांचा फोटो वगळून हा फ्लेक्स कोणी लावला असावा अशी चर्चा देखील शहरात सुरु आहे.फ्लेक्स लावलेल्या व्यक्तीचं नाव त्यावर लिहलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)