(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pathaan : पठाणचं पोस्टर फाडल्याने पुण्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
अभिनेता शाहरुख खान पठाण चित्रपटाचा बॅनर फाडल्यामुळे पुण्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Pathaan: अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) पठाण (Pathaan) चित्रपटाचा बॅनर फाडल्यामुळे पुण्यात बजरंग दलाच्या (Bajrang dal) कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राहुल चित्रपटाबाहेर बेकायदा जमाव जमून पठाण चित्रपटाचा बॅनर काढलं आणि जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आणि शाहरुख खानच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने गुन्हा दाखल केले आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बजरंग दलाचे नितीन महाजन यांच्यासह 15 ते 19 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दोन दिवसांपूर्वी राहुल चित्रपटाबाहेर बजरंग दलाकडून पठाण चित्रपट विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. अभिनेता शाहरुख खानच्या पठाण चित्रपटावरून पुण्यात बजरंग दल आक्रमक झाले होते. पुण्यातील राहुल चित्रपटगृहाच्या बाहेरील पोस्टर बजरंग दलाकडून काढण्यात आले होते. शाहरुख खानच्या काही चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर हे पोस्टर लावले होते. बजरंग दलानं राहुल थिएटरच्या चालकांना इशारा देऊन पोस्टर काढण्याची विनंती होती. त्यानंतर हे पोस्टर हटवण्यात आलं होतं.
पोस्टर फाडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर
बजरंग दलाने पठाण चित्रपटाचं पोस्टर फाडलं आणि त्यानंतर त्यांनी हा व्हिडीओ बजरंग दलाच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावेळी ते सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आशा पद्धतीने पठाण चित्रपटाचा पहिला अनाधिकृत पोस्टर 15 मिनिटात नेस्तनाभूत करण्यात आला. बाकीच्या चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांनी असे प्रकार करून समाजातील शांततेची परिस्तिथी खराब करून राष्ट्रभक्तांचा रोषाला सामोरे जाऊ नये विनंती, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं. मागील काही दिवसांपासून पठाण चित्रपटाचा वाद पेटला आहे. शाहरुख खानच्या चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटना या विरोध करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पठाण चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी देखील सोशल मीडियावर केली जात आहे.
गाण्यावरुन वाद
पठाण या चित्रपटातील बेशरम रंग आणि झुमे जो पठाण ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. यामधील बेशरम गाण्यामधील दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) बिकिनीच्या रंगामुळे वाद निर्माण झाला होता. अनेकांनी दीपिकाच्या बिकिनीच्या रंगावर टीका केली होती. त्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला.
चाहते उत्सुक...
हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे. भारतातच नाही तर जगभारत शाहरुख खानची क्रेझ आहे. पोस्टर जरी फाडलं असेल तरीही शाहरुख खानचे चाहते फर्स्ट डे फर्स्ट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
View this post on Instagram