Reema Chibbar Pune-pakistan: 90 वर्षीय रिना जेव्हा पुण्यातून 75 वर्षांनी पाकिस्तानातील वडिलोपार्जित घरी परतल्या...
भारताच्या फाळणीच्या वेळी अवघ्या 14 वर्षांची मुलगी असताना कुटुंबासह पुण्यात स्थलांतरित झालेल्या रीना वर्मा छिब्बर या वयाच्या 90 व्या वर्षी 75 वर्षांनी आपल्या जन्मगावी पोहोचल्या आहेत.
![Reema Chibbar Pune-pakistan: 90 वर्षीय रिना जेव्हा पुण्यातून 75 वर्षांनी पाकिस्तानातील वडिलोपार्जित घरी परतल्या... 90-Year-Old Woman From Pune Reaches Her Ancestral Home In Pakistan After 75 Years Reema Chibbar Pune-pakistan: 90 वर्षीय रिना जेव्हा पुण्यातून 75 वर्षांनी पाकिस्तानातील वडिलोपार्जित घरी परतल्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/22/d30102f3a21cca9e1eed8688ff56a6201658475238_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Reema Chibbar Pune-pakistan: आपलं घर म्हणजे प्रत्येकासाठीच आपुलकीचा विषय असतो. जग जरी फिरलो तरी प्रत्येकाला कायम घराची ओढ असते. हिच घराची ओठ रीना वर्मा छिब्बर यांना 75 वर्षांनी पाकिस्तानान घेऊन गेली आहे.
भारताच्या फाळणीच्या वेळी अवघ्या 14 वर्षांची मुलगी असताना कुटुंबासह पुण्यात स्थलांतरित झालेल्या रीना वर्मा छिब्बर या वयाच्या 90 व्या वर्षी 75 वर्षांनी आपल्या जन्मगावी पोहोचल्या आहेत. रीनाचा जन्म पाकिस्तानातल्या रावळपिंडी येथे झाला. तिचे घर देवी कॉलेज रोडवर होते. तिथल्या मॉडर्न स्कूलमधून तिचं शिक्षण झालं आहे.
रिना यांनी अटारीमार्गे पाकिस्तानात प्रवेश केला. पाकिस्तान सरकारने सदिच्छा म्हणून रीनाला तीन महिन्यांचा व्हिसा दिला आहे. रीनान यांनी पाकिस्तानच्या घरी जाण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले आणि पाकिस्तान उच्चायुक्तालयात व्हिसासाठी अनेक वेळा अर्ज केला होता. मात्र 75 वर्ष त्यांना परवानगी मिळू शकली नाही. त्यांनी1965 मध्ये असाच अर्ज केला होता पण तो यशस्वी झाला नव्हता.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली मदत
रीना यांनी एक पोस्ट अपलोड करून पुन्हा एकदा त्यांच्या वडिलोपार्जित घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांची पोस्ट पाकिस्तानी नागरिक सज्जाद हैदरने पाहिली त्यानंतर त्यांनी रीना यांच्याशी संपर्क साधला. रीनाचा पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी यांच्याशी संपर्क झाला ज्यांनी तिला व्हिसा प्रक्रियेत मदत केली.
75 वर्षांनंतर रीना वर्मा 20 जुलैला त्यांच्या जुन्या घरी पोहोचल्या. तेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. ढोल वाजवून त्यांचं स्वागत केलं. रीनानेही लोकांसोबत ढोल-ताशांच्या तालावर डान्स केला. फाळणीच्या वेळी पंजाबमधून स्थलांतरित झाल्यानंतर लुधियानामधील एक मुस्लिम कुटुंब आता राहत असलेल्या त्यांच्या घरात रिना यांनी वेळ घालवला. गेले 75 वर्ष मी माझ्या घरात येण्याची वाट बघत होते. माझं घर जसंच्या तसं आहे हे पाहून मला खूप आनंद झाला. आई-वडील आणि पाच भावंडांसोबतच्या बालपणीच्या आठवणी सांगताना रिना भावूक झाल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)