एक्स्प्लोर

Pune News : 287 आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर धडाधड कारवाई; कशी कराल ‘सी- व्हिजील’ वर तक्रार?

सी-व्हिजील ॲपवर जिल्ह्यात एकूण 278 तक्रारी दाखल झाल्या असून सर्व तक्रारींवर कार्यवाही पूर्ण झाली आहे.

पुणे : स्वतंत्र, पारदर्शक, निष्पक्ष, सर्वसमावेशक निवडणुका( Lok Sabha Election 2024 ) हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य असून भारत निवडणूक आयोगाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत अनेक नवनवीन उपयोजके (ॲप) विकसित करत नागरिकांचा निवडणूक सहभाग वाढविण्यावर भर दिला आहे. त्यापैकीच एक असलेले ‘सी-व्हिजील’ हे ॲप नागरिकांचा निवडणूक सहभाग वाढविण्यास उपयुक्त ठरत आहे. सी-व्हिजील ॲपवर जिल्ह्यात एकूण 278 तक्रारी दाखल झाल्या असून सर्व तक्रारींवर कार्यवाही पूर्ण झाली आहे.

लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्यासाठी जागरुक मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते असे नेहमीच म्हटले जाते. त्यासाठी नागरिकांचा सहभाग मतदानापुरताच मर्यादित न राहता निवडणूक प्रक्रियवेर लक्ष ठेवण्याचा असावा असा प्रयत्न भारत निवडणूक आयोगाचा आहे. त्यादृष्टीने आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन करण्यासाठी ‘सी-व्हिजील’ ॲप उपलब्ध करुन दिले आहे. हे ॲप म्हणजे नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सादर करण्यासाठी मिळालेले अत्यंत प्रभावी शस्त्र आहे.

कशी कराल ‘सी- व्हिजील’ वर तक्रार?

मतासाठी रोख रक्कमेची लाच देणे, मोफत वस्तू वाटणे, मद्य वाटप, विहित वेळेनंतर ध्वनीवर्धकाचा वापर, प्रतिबंधित कालावधीत निवडणूक प्रचार आदी विविध स्वरुपाच्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारी या ॲपवर साईन इन करुन करता येतात. याशिवाय नागरिक आपली ओळख जाहीर न करताही तक्रार दाखल करु शकतात.

आचारसंहिता भंगाचे पुरावे म्हणून त्या घटनेची छायाचित्रे, व्हिडीओ, ध्वनीफीती (ऑडिओ) अपलोड करावे. आपण ज्या ठिकाणी ही छायाचित्रे, व्हिडीओ घेऊन अपलोड केली ते ठिकाण जीपीएसद्वारे आपोआप जिओ टॅग होते. तसेच आचारसंहिता भंगाच्या ठिकाणाचा अधिक तपशिल भरण्याची सुविधादेखील यात आहे. यानंतर आचारसंहिता भंगाचे स्वरुप ड्रॉपडाऊन यादीतून निवडल्यानंतर संबंधित घटनेचे थोडक्यात वर्णन नमूद करणे आवश्यक असून तक्रार दाखल (सबमिट) करावी.

सी-व्हिजील ॲप हे जिल्हा नियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी, भरारी पथक, स्थीर संनियंत्रण पथकाशी जोडलेले असते. त्यामुळे तक्रार प्राप्त होताच सर्व संबंधित यंत्रणा गतीने कार्यवाही करते. भरारी पथकाला घटनेच्या ठिकाणी 15 मिनीटाच्या आत पोहोचणे बंधनकारक करण्यात आले आहे. तक्रार दाखल केल्यानंतर १०० मिनीटांच्या आत या तक्रारीवर कार्यवाही करुन त्याची माहिती तक्रारकर्त्याला पोहोचवली जाते. 

तक्रारकर्त्याची ओळख गुप्त राखण्यात येत असल्यामुळे त्याला संरक्षण प्राप्त होते हेदेखील या ॲपचे वैशिष्ट्य आहे. नागरिकांनी आचारसंहिता भंगाचे प्रकार आढळल्यास सी-व्हिजीलवर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : तरुण कोयता घेऊन तरुणीच्या मागे धावला, नागरिकांनी आरडाओरड केली अन् मोठा अर्थ टळला; पुण्यात नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
Supriya Sule on Dhananjay Mahadik : हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकलेABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 11 November 2024PM Modi Speech Mumbai  : पंतप्रधान मोदी 14 नोव्हेंबरला मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानात होणार सभाAjit Pawar Baramati : साहेब नसतील तर तालुका कोण बघणार?अजितदादांचा बारामतीकरांना सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
Supriya Sule on Dhananjay Mahadik : हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
Ajit Pawar : मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
Yugendra Pawar in Baramati: आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
Maharashtra Assembly Elections 2024 : माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
Embed widget