(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : तरुण कोयता घेऊन तरुणीच्या मागे धावला, नागरिकांनी आरडाओरड केली अन् मोठा अर्थ टळला; पुण्यात नेमकं काय घडलं?
पुण्यात कोयत्याचे हल्ले काही संपायचं नाव घेत (Pune Crime news) नाही आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) झालेल्या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे.
पुणे : पुण्यात कोयत्याचे हल्ले काही संपायचं नाव घेत (Pune Crime news) नाही आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) झालेल्या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे. इयत्ता एकरावीत शिकत असलेल्या मुलीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अडवत कोयत्याने हल्ला (Koyta Gang) करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र सुदैवाने ही घटना टळली आहे. या घटनेचा सी सी टिव्ही फुटेज समोर आलं आहे.
मुलगी बोलत नसल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे. तरुण हल्ला करायला आला असता नागरिकांनी आरडा-ओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेले दोन तरुणांनी पळ काढला आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात महेश सिद्धप्पा भंडारी आणि त्याच्यासोबत असलेल्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश आणि ती मुलगी हे दोघे ही एकमेकांना ओळखतात. दरम्यान मुलगी व तिच्या तीन मैत्रिणी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक ६ येथून जात होत्या. यादरम्यान महेश व त्याचा मित्र येथे आले. महेशकडे कोयता होता त्याने या वेळी झालेल्या वादातून त्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे असलेल्या नागरिकांनी हे पाहताच आरडा ओरड केली आणि या तरुणांनी तिथून पळ काढला. या मुलीकडून अद्याप पोलिसात तक्रार देण्यात आलेली नसली तरी सुद्धा पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून गुन्हा दाखल केला आहे .काही महिन्यांपूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीजवळ एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करण्याचे प्रयत्न झाला होता.
पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. पुण्यातील विविध परिसरात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. ही दहशत रोखण्याचे प्रयत्न पुणे पोलिसांकडून सातत्याने सुरु आहेत. मात्र तरीही प्रकार संपत नसल्याचं समोर येत आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अनेक उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. या टवाळ गुन्हेगारांना रोखण्यासाठी रोज नव्या शक्कल लढवत आहेत. अल्पवयीन गुन्हेगार असेल तर त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारादेखील दिला आहे. या टवाळखोरांना रोखण्याचं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
इतर महत्वाची बातमी-
Mahayuti : शिवसेनेवर नामुष्की; हिंगोली, हातकणंगलेचा उमेदवार बदलण्यासाठी शिंदेंवर दबाव?