एक्स्प्लोर
गोडाऊन फोडून 1700 मोबाईल चोरणारे आरोपी गजाआड

पुणे: पुण्यातल्या लोणीकंदमध्ये गोडाऊन फोडून 1700 मोबाईल चोरणारे आरोपी गजाआड झाले आहेत. कबीर शेख आणि गोपाळ मुराडे अश्या अटक आरोपींची नाव आहेत. दोन आरोपी अजूनही फरार आहेत. 25 जुलैला वाघोली परिसरातील शिवसरकार वेअर हाऊस फोडून चोरट्यांनी 1700 मोबाईल लंपास केले होते. दरम्यान, या दोन चोरट्यांकडून पोलिसांनी 1605 मोबाईल हस्तगत केले आहेत. औरंगाबाद आणि रायगड परिसरात हे मोबाईल विकले जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली आहे.
Before You Go
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य





















