एक्स्प्लोर

पुण्यात मास्क न वापरल्यास होऊ शकतो एक हजार रुपये दंड!

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क न वापरणाऱ्यांना 1000 रुपये दंड करण्याचा विचार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क न वापरणाऱ्यांना 1000 रुपये दंड करण्याचा विचार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढलं आहे. मात्र तरीही नागरिक आवश्यक ती काळजी घेत नसल्याचं अजित पवार यांचं म्हणणं आहे. मास्क वापरण्यासाठी वारंवार सूचना दिल्यानंतर देखील लोक मास्क वापरत नाहीत आणि त्यामुळे आता दंडाची रक्कम वाढवावी लागेल असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सध्या मास्क वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड करण्यात येतो. परंतु आता तो आणखी वाढवण्याचा विचार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे अजित पवार यांनी ही घोषणा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. आज अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या 210 व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची क्षमता असलेल्या हॉस्पिटलचे उद्घाटन झालं.

त्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेने उभारलेल्या अशाच हॉस्पिटल्सचे देखील उद्घाटन केलं. पुणे महापालिकेने उभारलेल्या या हॉस्पिटलमध्ये 314 बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यामध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध असणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये या आधीच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोन जंबो हॉस्पिटल सुरू झालेत. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात उभारण्यात आलेल्या जंबो हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अण्णासाहेब मगर मैदानावरती उभारलेल्या दुसऱ्या जंबो हॉस्पिटलचे उद्घाटन अजित पवार यांच्याच उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी पार पडलं.

मात्र तरीही पुण्यात परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट बनवलीय. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतेय. त्यामुळे आता मास्क घालण्यावर आणखी कडक कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलंय. त्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉलला एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत दंडाची रक्कम वाढवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणं हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनलंय. राज्यातील सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ही सध्या पुण्यात आहे. पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या ही एक लाख तीस हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईलाही पुण्याने या बाबतीत मागे टाकलंय.

पुण्यात दररोज दोन ते अडीच हजार संख्येमध्ये नवीन कोरुना रुग्णांची नोंद होतेय. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण पडतोय. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर सुविधा असलेली चार हॉस्पिटल उभारण्यात आली आहेत. त्यातील दोन हॉस्पिटलचं उद्घाटन आज करण्यात आलं. या चारही हॉस्पिटल्स मध्ये मिळून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. मात्र सातत्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येला ही हॉस्पिटल्स पूर्ण ठरू शकतील का याबद्दल शंका आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घेण्याची गरज नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.

याआधी अनेक शहरांमध्ये मास्क न घालणाऱ्यांवर पोलिस कारवाई करत असल्याचं आणि दंड वसूल करत असल्याचं दिसून आलंय. मात्र तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आल्याचे दिसून आलेलं नाही. आता दंडाची रक्कम वाढवून एक हजार रुपये करण्याचा विचार सुरु झाल्यावर तरी लोक व्यवस्थित मास्क वापरण्याकडे वळतील आणि कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल ही अपेक्षा.

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Pune Jamavbandi: पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget