एक्स्प्लोर

Pune Hinjwadi Tempo Fire: पुण्याच्या हिंजवडीतील टेम्पो जळीत कांड प्रकरणाला धक्कादायक वळण; सीसीटीव्ही पाहून सर्व हादरले!

Pune Hinjwadi Tempo Fire: पुण्याच्या हिंजवडीतील टेम्पो जळीत कांड प्रकरणाला धक्कादायक वळण आले आहे.

Pune Hinjwadi Tempo Fire पुणे: पुण्याच्या (Pune News) हिंजवडीतील टेम्पो जळीत कांड प्रकरणाला (Pune Hinjwadi Tempo Fire) धक्कादायक वळण आले आहे. चालकानेच गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. टेम्पो चालकावर चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनादरम्यानचे सीसीटीव्ही देखील समोर आले आहे. 

पुण्यातील हिंजवाडी परिसरात टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागल्याची घटना 19 मार्च रोजी घडली होती. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला असून पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून देण्यात आल्याचं आणि हे कृत्य चालकाने केल्याचं तपासात उघड झालंय. मात्र ज्यांना जीवे मारायचं होते, ते यातून बचावले आणि निष्पाप चौघांचा यात बळी गेला.

टेम्पो ट्रॅव्हल्स जाळण्याचे कारण काय?

दिवाळी बोनससह पगार थकवला आणि चालक असून मजुरांची कामे सांगितली जात होती. त्यामुळे टेम्पो चालक जनार्दन हंबर्डीकरने हा कट रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं बिंग फुटलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याने या घटनेवर हळहळ व्यक्त करणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, हे सर्व कर्मचारी सकाळच्या शिफ्टला ऑफिसला चालले होते.

ते शेवटपर्यंत झगडले-

गाडीच्या जळालेल्या लोखंडावर ओरखडे होते. ते शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. कोणीतरी त्या बंद दरवाज्याला ओरबाडून उघडायचा प्रयत्न केला होता. जीवाच्या अकांताने ते दार उघडण्याचा प्रयत्न करत असतील. पण तो दरवाजा उघडला नाही. फुटलेल्या काचांवरही असेच निशाण होते. ते शेवटपर्यंत झगडले होते. या घटनेनंतर त्या जळालेल्या बसच्या कोपऱ्यामध्ये जेवणाचे डबे, जळालेल्या चपला दिसत होत्या. या बसमधील जळालेल्या सीटचा कोळसा झाला आहे. गाडीच्या आतील धातू देखील वितळला आहे.

हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्सच्या आग - मृतक आणि जखमींची नावं

मृत्यू झालेल्यांची नावे-

-सुभाष भोसले, वय 42
-शंकर शिंदे, वय 60
-गुरुदास लोकरे, वय 40
-राजू चव्हाण, वय 40,

जखमी झालेल्यांची नावे

-प्रदीप राऊत 
-प्रवीण निकम 
-चंद्रकांत मलजीत 
-संदीप शिंदे
-विश्वनाथ झोरी
-जनार्दन हंबारिडकर - टेम्पो चालक

संबंधित बातमी:

बेंझीन केमिकल, कापडाच्या चिंध्या अन् मोठा ब्लास्ट, हिंजवडीच्या भीषण आगीमागे ड्रायव्हरचा 'क्रिमिनल माईंड'; मृत्यूचा खेळ कसा रचला?  

हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला

महत्त्वाच्या बातम्या

मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेत 'बोगस' दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा! 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, प्रशासकीय वर्तुळात खळबळ
जळगाव जिल्हा परिषदेत 'बोगस' दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा! 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
Embed widget