एक्स्प्लोर

Yavatmal News: आधी बोटाला शाई, मग पैशाचं वाटप,बोगस मतदानावरुन यवतमाळमध्ये राडा; ठाकरे गटाचा गंभीर आरोप

पैसे वाटणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा अशी मागणी करत देशमुख पोलीस स्टेशनमध्ये आहेत.

यवतमाळ:  यवतमाळ (Yavatmal News)  येथे मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचे वाटप करुन मतदानापासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. छोटी गुजरी परिसरामध्ये भाजपची काही मंडळी एका रजिस्टरवर मतदारांची नावे लिहून, त्यांच्या बोटाला शाई लावून पैशाचं वाटप करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला. यानंतर यवतमाळ वाशिमचे मविआ उमेदवार संजय देशमुख या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.पैसे वाटणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा अशी मागणी करत देशमुख पोलीस स्टेशनमध्ये आहेत.

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचे वाटप करून मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. छोटी गुजरी परिसरामध्ये भाजपची काही मंडळी एका रजिस्टरवर मतदारांची नावे लिहीत होती. त्या मतदारांच्या हाताच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशांचे वाटप केल्या जात होते. विशिष्ट भागातील हे मतदार मतदान करू नये असा प्रकार सुरू होता. याबाबत तक्रार केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाच्या भरारी पथकासह त्या ठिकाणी छापा मारला असता भाजपची मंडळी त्या ठिकाणाहून पळून गेली. मात्र बोटाला लावली जात असलेली शाई, ब्रश आणि मतदारांच्या नावांचे रजिस्टर भरारी पथकाच्या हाती लागले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची कारवाई सुरू आहे.

परभणीत देखील  बोगस मतदान

परभणी लोकसभेसाठी मतदान होत.  मात्र इथं आधार कार्ड झेरॉक्सवर बनावट मतदान झाल्याचे समोर आलंय. परभणी शहरातील महात्मा फुले मतदान केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला आहे, रझिया सत्तार या मतदानासाठी मतदान केंद्रावर आल्या असता त्यांचे मतदान अगोदरच झाल्याचं समोर आलंय. रझिया सत्तार या मतदानासाठी मतदान केंद्रावर आल्या असता त्यांचे मतदान अगोदरच झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी केंद्र प्रमुख दवंडे यांना हा प्रकार सांगितला. तसेच काँग्रेसचे नेते सिद्धार्थ हत्तीबीरे यांना ही त्यांनी बोलावुन हा प्रकार सांगितला आहे.  त्यामुळे या मतदान केंद्रावर काँग्रेस सह शिवसेनेचे पदाधिकारी ही जमले आहेत केवळ महात्मा फुले माध्यमिक विद्यालय येथील मतदान केंद्रावरच नाही तर इतर मतदान केंद्रांवरही असाच प्रकार झाल्याचं आरोप काँग्रेस नेते सिद्धार्थ केंद्र यांनी केला असून यामागे भाजप असल्याचेही ते म्हणाले आहेत दरम्यान याप्रकरणी जिल्हाधिकारी यांना सांगून तक्रारही त्यांच्या वतीने करण्यात आलीय.

हे ही वाचा :

 हिंगोलीत पहिल्या दोन तासांमध्ये मतदानात एक ना अनेक अडथळे, 39 बॅलेट मशीन तर 16 कंट्रोल युनिट बदलले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget