Hingoli Lok Sabha: हिंगोलीत पहिल्या दोन तासांमध्ये मतदानात एक ना अनेक अडथळे, 39 बॅलेट मशीन तर 16 कंट्रोल युनिट बदलले
Lok Sabha Election 2024: मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे मतदानाचा टक्का थोडा घसरला आहे. हिंगोली 7.23 टक्के मतदान झाले.
Lok Sabha Election 2024: दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला (Lok Sabha Election 2024) सुरुवात झाली आहे. या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, केरळ सहित 13 राज्यातील 88 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळपासून उत्साहात मतदान सुरू असले तरी गोंदिया आणि नागपूरमध्ये काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मतदान सुरू होण्यास उशीर झाला. तर हिंगोलीत 39 मतदान केंद्रावर मतदानासाठी अडथळा आला आहे.
हिंगोलीत 39 मतदान केंद्रावर पहिल्या दोन तासात मतदानासाठी अडथळा आली आहे. हिंगोलीत 39 बॅलेट मशीन आणि 16 कंट्रोल युनिट बदलले. 25 ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या मशीन बदलाव्या लागल्या आहेत. एकूण 39 हून अधिक मतदान केंद्रावर पहिल्या दोन तासांमध्ये मतदानाला अडथळा मतदानाला अडथळा आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या या मतदान केंद्रावर सुरळीत सुरू झाला आहे. सकाळच्या टप्प्यात तापमानाचा पारा कमी असल्याने मतदारांनी सकाळी गर्दी केली होती. मात्र मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे मतदानाचा टक्का थोडा घसरला आहे. हिंगोली 7.23 टक्के मतदान झाले.
अमरावतीच्या वडरपुरा भागातील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड
अमरावतीच्या वडरपुरा भागातील महापालिका शाळेतील मतदान केंद्रात ईव्हीएममध्ये बिघाड झाला आहे. या केंद्रात तीन खोल्या आहेत. त्यापैकी खोली क्रमांत १ मधील ईव्हीएममध्ये बिघाड झालं. परिणामी इथलं मतदान थांबलं होते.
नांदेडच्या मतदान केंद्र 5 वरील ईव्हीएम मशीन बंद
नांदेडच्या मतदान केंद्र 5 वरील ईव्हीएम मशीन बंद झालंय. गेल्या तासाभरापासून मतदान केंद्र बंद असल्यानं मतदारांचा खोळंबा झाला होता.. तर वर्ध्यातील कारंजामधील मतदान केंद्रातही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला होता.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.45 टक्के मतदान
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी 7 पासून सुरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 7.45 टक्के मतदान झाले आहे.
पहिल्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
- वर्धा - 7.18 टक्के
- अकोला - 7.17 टक्के
- अमरावती -6.34 टक्के
- बुलढाणा - 6.61 टक्के
- हिंगोली - 7.23 टक्के
- नांदेड - 7.13 टक्के
- परभणी - 9.72 टक्के
- यवतमाळ - वाशिम - 7.23 टक्के
हे ही वाचा :
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील ८८ मतदारसंघात मतदान सुरू, महाराष्ट्रात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड आणि परभणीत मतदार बजावतायेत हक्क