एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

अपघातावेळी मिहीर शाह ड्रग्जच्या नशेत; ब्लड टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ नये म्हणून...; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Worli Hit And Run: मिहीर शाह अपघातावेळी ड्रग्जच्या नशेत होता, हे मेडिकल रेकॉर्डमध्ये येऊ नये म्हणून तीन दिवसांपर्यंत त्याला फरार करण्यात आलं, संजय राऊतांचा खळबळजनक दावा.

Sanjay Raut on Worli Hit And Run Case: मुंबई : वरळी (Worli Accident) हिट अँड रन प्रकरणानं (Hit And Run Case) संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra News) हादरला. महिलेला आपल्या महागड्या गाडीनं एकदा नाहीतर दोनदा चिरडणाऱ्या मिहीर शाह (Mihir Shah) याला बेड्या घालण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. तब्बल तीन दिवसांनी पोलीस आरोपी मिहीर शाहपर्यंत पोहोचले. अशातच, आता ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबई पोलिसांकडेही संशयानं बोट केलं आहे. मिहीर शाह अपघातावेळी ड्रग्जच्या नशेत होता, हे मेडिकल रेकॉर्डमध्ये येऊ नये म्हणून तीन दिवसांपर्यंत त्याला फरार करण्यात आलं, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, यावरुन मुंबई पोलिसांवरही संशयाची सुई येते, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत वरळी हिट अँड रन प्रकरणी बोलताना म्हणाले की, "सरकारकडून वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपींनी वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. हिट अँड रनचं प्रकरण साधंसुधं प्रकरण नाही आहे. पुण्यात जसं झालं अग्रवाल कुटुंबाचं प्रकरण, तसेच हीसुद्धा 'नेता फॅमिली' आहे. हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील आहेत, त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड चेक करा. तसेच, आरोपीचे वडील शिवसेना शिंदे गटाचा नेता आहे. त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड जर पोलिसांकडे नसेल, तर आम्ही तो पाठवतो. 

मुख्य आरोपीचे वडील मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय कसे झाले? : संजय राऊत 

"अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, काय करतात? एवढ्या महागड्या गाड्या कशा येतात? याचा हिशोब मुंबई पोलिसांना आता करावा लागेल. मुख्य आरोपीचे वडील मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय कसे झाले? तुम्हीही बोरिवली पोलीस स्टेशनला जाऊन सगळा रेकॉर्ड चेक करा. मी मुंबई पोलीस आयुक्तांना आवाहन करतोय, मुख्य आरोपींच्या वडीलांचा रेकॉर्ड सर्वांसमोर आणा.", असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

नशेत एका निरपराध महिलेला चिरडलंय या लोकांनी, एकदा नाही तर वारंवार चिरडलंय : संजय राऊत 

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर कोणत्या प्रकारचे लोक बसले आहेत, हे समजेल. हा मुलगा ड्रग्जच्या नशेत होता. हे मेडिकल रेकॉर्डमध्ये येऊ नये म्हणून तीन दिवसांपर्यंत त्याला फरार केलं होतं. त्यानंतर त्याला सर्वांसमोर आणलं आणि अटक केली गेली. यावरुन मुंबई पोलिसांवरही संशयाची सुई येते. नशेत एका निरपराध महिलेला चिरडलंय या लोकांनी. एकदा नाही तर वारंवार चिरडलंय. रस्त्यावर फेकून देऊन पुन्हा चिरडलंय. हा खूपच अमानुष प्रकार आहे. त्यामुळे अशी व्यक्ती कायद्याच्या कचाट्यातून सुटली नाही पाहिजे. आणि जर सुटलीच तर रस्त्यावर उतरुन लोकांनी जाब विचारला पाहिजे मुंबई पोलिसांना आणि मंत्रालयात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे.", असं संजय राऊत म्हणाले. 

"वरळी हिट अँड रन प्रकरणातल्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून होत होता. कारण त्याचे वडील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आहेत. खूपच पैसेवाला माणूस आहे, तुम्ही त्याचे रेकॉर्ड चेक करू शकता. पैसे कुठून येतात आणि काय आहे? हे समजेल. त्यात ठाणे जिल्ह्याचा आहे, त्यामुळे तुम्ही समजून जा, कोणाशी कसे आणि काय संबंध आहेत.", असं संजय राऊत म्हणाले. 

पाहा व्हिडीओ : Sanjay Raut PC: क्रॉस व्होटिंगची कुणाला भीती? आम्ही विधानपरिषदेच्या तिन्ही जागा जिंकू, राऊतांचा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Embed widget