उद्धव ठाकरे हे 2024 मध्ये विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदासाठीचा चेहरा असतील का? संजय राऊत म्हणाले...
लोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधी पक्षांनी आताच मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. अशातच उद्धव ठाकरे हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधी पक्षांनी आताच मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. अशातच उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार (Opposition Party Prime Minister Face Off 20224 Election) असू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की,'' याविषयी आता भाकीत करणं सोपं नाही. राजकरणात काही घडू शकतं.''
Lok Sabha Election 2024: 'पंतप्रधान कोण होणार हे नंतर पाहू, आधी एकत्रित येणं महत्वाचं'
याबाबत बोलताना संजय राऊत (sanjay raut) पुढे म्हणाले, ''उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे एक उत्तम चेहरा आहेत. महाविकास आघाडीने ठरवलं होत की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतील तरच आपण एकत्र येऊ आणि सरकार बनलं. आज जे विरोधी पक्षामध्ये प्रमुख चेहरे (Opposition Party Prime Minister Face Off 20224 Election) आहेत, त्यात उद्धव ठाकरे यांचा चेहरा अधिक महत्वाचा आहे.'' ते म्हणाले, ''महाराष्ट्र मोठं राज्य आहे. ते ठाकरे असून हिंदुत्ववादी आहेत. मात्र पंतप्रधानपदासाठी या देशाला मुख्य चेहरा कोण असेल, यापेक्षा एकत्रित येणं गरजचं आहे. पंतप्रधान (Opposition Party Prime Minister Face Off 20224 Election) कोण असेल, हे नंतर ठरवता येईल. मात्र आधी एकत्र येऊन निवडणूक लढवणं महत्वाचं आहे. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचा जो भर आहे, तो सगळ्यांनी एकत्र येण्यावर आहे. पंतप्रधान कोण हे आपण नंतर पाहू असंही ते (उद्धव ठाकरे) म्हणाले.''
Lok Sabha Election 2024: 'विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील'
संजय राऊत (sanjay raut) म्हणाले, विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी (Opposition Party Prime Minister Face Off 20224 Election) उद्धव ठाकरे (uddhav thackeray) पुढाकार घेत आहेत. ही 24 तासात पार पडणारी प्रक्रिया नाही. शरद पवार (sharad pawar) देखील त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. चंद्रशेखरराव हे देखील यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने यासाठी प्रयत्न करत असून या सगळ्यांचा नेता लगेच ठरणार नाही. सगळे एकत्र बसल्यावर देखील नेता ठरवायला वेळ लागणारच.
इतर महत्वाची बातमी: