Bjp Mns Alliance: भाजप-मनसे युती होणार? गिरीश महाजन यांनी दिले संकेत
Girish Mahajan On Bjp Mns Alliance: भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात आगामी काळात युती होऊ शकते, असे संकेत भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन यांनी दिले आहेत.
Girish Mahajan On Bjp Mns Alliance: भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात आगामी काळात युती होऊ शकते, असे संकेत भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन यांनी दिले आहेत. 'एबीपी माझा'शी बोलताना महाजन म्हणजे आहेत की, ''राज ठाकरे हिंदुत्वाचे विचार मांडत आहे. वरिष्ठ पातळींवर निर्णय होईल, पण मनसे सोबत भाजपाची युती होऊ शकते.''
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात स्पर्धा
यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले आहेत की, राज ठाकरे हिंदुत्वावर बोलत आहेत, हे चांगलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात स्पर्धा आहे. उद्धव ठाकरे म्हणतात राज यांचं हिंदुत्व हे बनावटी आहे. ते बनावटी हिंदू हृदयसम्राट बनायचं प्रयत्न करतायत, असं उद्धव ठाकरे म्हणत आहे. मात्र कोण ओरिजिनल कोण डुप्लिकेट हे जनता ठरवणार. वेळेवर निवडणुकीत त्यांना त्याचं उत्तर मिळणार आहे, असं महाजन म्हणाले.
मनसे-भाजप युती होणार?
भाजप आणि मनसे यांच्या युतीबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले आहेत की, राजकारणात काही अशक्य नाही. हा सर्व प्रश्न आमच्या वरिष्ठांचा आहे. ते त्याबद्दल निर्णय घेणार. ते म्हणाले आहेत की, आमचे वरिष्ठ ठरवणार ते आम्हाला मान्य असेल.
दरम्यान, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. तसेच दादर आणि ठाणे येथे झालेल्या सभेत त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. तसेच मंगळवारी ठाण्यात झालेल्या आपल्या उत्तर सभेत त्यांनी राज्य सरकारला 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवावे, असं अल्टिमेटम दिलं आहे. असं न झाल्यास त्यांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. मनसेचं हे बदललेलं धोरण पाहता, येत्या आगामी काळात भाजप आणि मनसे युती होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :