(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Baba Siddique Death : ईफ्तार पार्टीचा बादशाह, मुंबईतील बडा नेता, कोण होते बाबा सिद्दीकी?
Baba Siddique Death : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धीकी यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी सध्या समोर येत आहे.
Baba Siddique Death : मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांपैकी महत्त्वाचे नेते समजले जाणाऱ्या बाबा सिद्दीकी (Baba Siddique Death ) यांनी काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर वांद्रे पूर्व हा मतदारसंघ बराच चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. पण सध्या बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची मोठी बातमी समोर आलेली आहे. अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला असून बाबा सिद्दीकी या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे.
बाबा सिद्दीकी यांनी जवळपास 48 वर्ष काँग्रेस पक्षात काम केलं. इतकच नव्हे तर ते सलग तीन वेळा वांद्रे पूर्व या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेत. इतकच नव्हे तर बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीचीही बरीच चर्चा असते. बॉलिवुडमधले मोठ मोठे सेलिब्रेटी हे बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावतात. दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळाबारीच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय. बाबा सिद्दीकी यांच्यावर झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर गोळीबार झाला आणि याच गोळीबारात त्यांची हत्या झाली.
बाबा सिद्दीकी कोण होते?
बाबा सिद्दीकी यांनी 1977 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी त्यावेळच्या विविध विद्यार्थ्यांच्या चळवळींमध्ये नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या मुंबई चॅप्टरचे सदस्य म्हणून भाग घेतला,जी काँग्रेसची विद्यार्थी शाखा होती. 1980 मध्ये ते वांद्रे युवक काँग्रेसच्या वांद्रे तालुक्याचे सरचिटणीस बनले आणि पुढील दोन वर्षांत त्यांची अध्यक्षपदी निवड झाली.1988 मध्ये ते मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. चार वर्षांनंतर त्यांची मुंबई महानगरपालिकेत नगरपरिषद म्हणून निवड झाली आणि पाच वर्षांनंतर त्यांची पुन्हा या पदावर निवड झाली.
झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जात होते. पण बाबा सिद्दीकी यांनी 10 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी हे काँग्रेसच्या तिकीटावर तीन वेळा ते आमदार झाले आहेत. त्याशिवाय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय.वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 1999 मध्ये ते आमदार झाले. 2004 आणि 2009 मध्ये ते पुन्हा निवडून आले. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दीकी हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते.
2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती.बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते.2014 च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा अशिष शेलार यांनी पराभव केला होता.