(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Petrol Diesel Price: महाराष्ट्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कधी कमी करणार? शरद पवार म्हणतात..
Petrol Diesel Price: महाराष्ट्रातही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी विधान केले आहे.
Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्रातील मोदी सरकारने उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच अनेक भाजपशासित राज्यांनी तेलावरील व्हॅटही कमी केला आहे. त्याचवेळी राज्यांमध्ये व्हॅट कमी न केल्याबद्दल भाजपने विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान केले आहे.
शरद पवार म्हणाले, "आम्हाला या मुद्द्यावर राज्य सरकारशी बोलावे लागेल. ते पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नक्कीच दिलासा देतील. मात्र, केंद्राने राज्याला जीएसटीची भरपाई लवकरात लवकर द्यावी. तरच जनतेला मदत करण्यासाठी हा निर्णय घेणे शक्य होईल."
We'll have to speak with State Govt over this issue. They've said they'll definitely provide relief(on petrol-diesel prices)but Centre should provide due GST compensation to the State at the earliest. It'll be possible to take this decision to help people only after it: NCP Chief pic.twitter.com/xY9sLma7yz
— ANI (@ANI) November 5, 2021
महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी न केल्याबद्दल भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राज्य सरकारला घेरले आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्रात महावसुली आघाडी आहे. पेट्रोल 110 रुपये आणि डिझेल 87 रुपये आहे. महाराष्ट्रात पेट्रोलवर 31 रुपये 19 पैसे व्हॅट आहे."
विशेष म्हणजे दिवाळीच्या दिवसापासून सर्वसामान्यांना दिलासा देत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली. डिझेल 10 रुपयांनी तर पेट्रोल 5 रुपयांनी कमी झाले आहे. केंद्र सरकारने राज्यांना पेट्रोल आणि डिझेल व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले, त्यानंतर लवकरच उत्तर प्रदेश, आसाम, उत्तराखंड, बिहार, कर्नाटक, गोवा, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश यासह अनेक राज्यांमध्ये व्हॅट कपातीची घोषणा करण्यात आली.