विरोधकांचा हिंदुत्वाशी संबंध काय? भाजप-मनसेवर राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut On Hindutva: ''विरोधकांचा हिंदुत्वाशी संबंध काय? हिंदुत्वासाठी देशात सर्वात जास्त त्याग करणारी कोण व्यक्ती असले तर ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना. : संजय राऊत

Sanjay Raut On Hindutva: ''विरोधकांचा हिंदुत्वाशी संबंध काय? हिंदुत्वासाठी देशात सर्वात जास्त त्याग करणारी कोण व्यक्ती असले तर ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वासाठी मतदानाचा हक्क 6 वर्ष हिरावण्यात आला होता. इतका मोठा त्याग या देशात हिंदुत्वासाठी कोणीच केला नाही'', असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मनसे आणि भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेना प्रवक्त्यांची बैठक बोलावली होती. वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राऊत असं म्हणाले आहेत.
काही हिंदू ओवेसी शिवसेना विरोधात : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, 1992 साली झालेल्या दंगलीत शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं आहे, तेव्हा हे सगळे कुठे होते. हिंदुत्वावर कोणी बोलावं, स्वतः आपण रक्ताचा एक थेंब तरी सांडला आहे का? रक्त सोडून द्या घामाचे दोन थेंब तरी यांच्या कपाळावरून खाली पडले का हिंदुत्वाचे. ते म्हणाले, ओवेसी यांना ज्या प्रकारे मुस्लिम मत कापण्यासाठी उतरवलं जात भाजपकडून, तसे काही हिंदू ओवेसी शिवसेना विरोधात वापरण्याचं त्यांचं षडयंत्र असल्याचं राऊत म्हणाले आहेत.
मराठवाड्यात 8 जून रोजी उद्धव ठाकरे यांची सभा
तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची आणि शिवसंपर्क अभियानाची माहिती दिली आहे. ते म्हणाले, ही बैठक चांगल्या प्रकारे पार पडली. येत्या 26 ते 28 मे दरम्यान शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होईल, अशी माहिती त्यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागात शिवसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. तसेच 8 जून रोजी मराठवाडा येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
