एक्स्प्लोर

वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार, धनंजय मुंडेही संशयाच्या भोवऱ्यात; हार्वेस्टिंग मशीन अनुदान फसवणूक प्रकरणी 19 जणांचे तक्रारी अर्ज

वाल्मिक कराड  याने ऊस हार्वेस्टिंग करणाऱ्या मशीन मालकांना अकरा कोटी वीस लाखाची टोपी घातल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आता यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत आलेला  वाल्मिक कराड (Walmik Karad) हाच मुख्य आरोपी असल्याचं आणि सर्वात जास्त आरोप असल्याचं सध्या चित्र समोर येत आहे. दरम्यान, वाल्मिक कराड  याने ऊस हार्वेस्टिंग करणाऱ्या मशीन मालकांना अकरा कोटी वीस लाखाची टोपी घातल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आता यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत काल रात्री उशिरा पंढरपूर परिसरातील फसवणूक झालेल्या 19 मशीन मालक शेतकऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले असून त्यांच्याकडून तक्रारी अर्ज दाखल केले आहेत.

आता या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असून या 11 कोटी 20 लाखाची फसवणूक झालेल्या सर्व मशीनधारकांना त्यांच्या जवळील पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. यातील तथ्य तपासून पुढील दोन दिवसात वाल्मिक कराड, जितेंद्र पालवे आणि नामदेव सानप यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

140 जणांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याची तक्रार

ऊस हार्वेस्टिंग करणाऱ्या राज्यातील जवळपास 140 शेतकरी मशीन धारकांना 36 लाखाचे अनुदान मिळवून देतो म्हणून वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकार्याने प्रत्येकी आठ लाख रुपये देण्यास सांगितले होते. तात्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आपले निकटवर्ती असून आम्ही तुम्हाला हे अनुदान मिळवून देतो, असे सांगत या सर्व 140 जणांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याची तक्रार या शेतकऱ्यांची आहे. यासाठी 14 सप्टेंबर 2024 रोजी धनंजय मुंडे यांची वाल्मिक कराड यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घडवून आणल्याचा गोप्यस्फोटही या तक्रारदारांनी केला आहे. यावेळी मुंडेंनीही आश्वासन दिल्याचा दावा या शेतकऱ्यांचा आहे.

श्रीकांत नागणे, दिलीप नागणे यांच्यासह 19 जणांचे जबाब 

पालघर येथील एका हॉटेलमध्ये पैसे मोजून देतानाचे फोटो आणि मुंडे यांच्या भेटीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. यातील एका फोटोत जितेंद्र पालवे हा पैसे मोजून घेताना दिसत असल्याचा दावा तक्रारदारांचा आहे. या तक्रारदारांकडे प्रत्येक नोटीचे नंबर आणि व्हिडिओ देखील असून अनेकांनी कर्ज काढून आणि सावकाराच्या माध्यमातून हे पैसे उभा केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिरीष हुंबे यांनी श्रीकांत नागणे, दिलीप नागणे यांच्यासह 19 जणांचे जबाब काल रात्री उशिरा नोंदवले आहेत. या सर्वांचे तक्रारी अर्ज देखील पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले असून येत्या दोन दिवसात सर्व पुरावे सादर करण्याची सूचना पोलिसांनी या शेतकऱ्यांना दिलेली आहे.

सर्व पुरावे आणि तथ्य समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे पोलिसांचे सांगणे असून आता हे सर्व फसवणूक झालेले शेतकरी पुरावे गोळा करायला लागले आहे. विशेष म्हणजे सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या भेटीचे व्हिडिओ आणि फोटो देखील सध्या व्हायरल झाले असून पैसे देतानाचा एक फोटोही समोर आला आहे. ही हार्वेस्टिंग मशीन साधारण एक कोटी रुपयाची असून यासाठी पूर्वी अनुदान मिळत होते. मात्र नंतरच्या काळात हे अनुदान बंद होऊ नये कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. 

फसवणुकीची व्याप्ती मोठी, मुख्यमंत्र्‍यांनी वरिष्ठ पातळीवरून तपास करावा

आता या सर्व शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज दाखल केला असून राज्यातील विविध भागातील हे तक्रारदार असल्याने आता राज्यात अनेक ठिकाणी हे तक्रारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल. या प्रकाराची व्याप्ती मोठी असून या त अनेक जण सामील असल्याने याचा वरिष्ठ पातळीवरून मुख्यमंत्र्यांनी तपास करावा, अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. या शेतकऱ्यांनी आमदार सुरेश धस आणि मनोज दादा जरांगे यांच्याही कानावर हा सर्व प्रकार घातला असून आम्हा गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Chavan : भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावीVishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Chavan : भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
BJP : भाजपचं खेड्याकडे चला, सर्व मंत्र्यांना एक दिवस खेड्यात मुक्काम करावा लागणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्काम करा, भाजपच्या मंत्र्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Embed widget