एक्स्प्लोर

Vijay Wadettiwar: दिवाळीनंतर अंधार होईल इतकी राज्याची तिजोरी साफ केलीय; विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका 

Vijay Wadettiwar: दिवाळीनंतर अंधार होईल इतकी राज्याची तिजोरी साफ केली आहे. राज्याच्या तिजोरीवर सफाईदारपणे हात मारला आहे. अशी घणाघाती टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यातील सध्याचे मंत्रिमंडळ जेलमध्ये गेले पाहिजे, इतका धिंगाणा घातला आहे. 30 टक्के टेंडर ची मर्यादा ओलांडून वाटले आणि पैसे खाल्ले आहेत. 8 लाख कोटी कर्ज आणि 2 लाख कोटींची देणं आहे. दिवाळीनंतर अंधार होईल इतकी राज्याची तिजोरी साफ केली आहे. राज्याच्या तिजोरीवर सफाईदारपणे हात मारला आहे. अशी घणाघाती टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे.

नाते-गोते नाही तर जिंकण्याची हमी असले तो उमेदवार

जो जिंकेल त्याला उमेदवारी, नाते-गोते नाही तर जिंकण्याची हमी असले तो उमेदवार असेल. महाविकास आघाडीला सत्तेत आणण्यासाठी स्वतः राहुल गांधी यांनी लक्ष घातले आहे. 87 जागा घोषित केल्या आहेत. तर 14 जागेवर स्क्रिनिंग आणि (सीईसी) CEC झाली आहे. आम्ही संख्या मोजत नाही, तर जिंकणारे उमेदवार मोजत आहोत. जे महाविकास आघाडीचे आता 200 च्या पुढे जात आहे. तर अनेक जागेवर पुनरविचार होत आहे. सोशल इंजिनिअरिंग संबंधाने राहुल गांधी काळजी घेत आहे. अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

दोन तीन जागांची अदला बदली, आज रामटेकचाही निर्णय

दलित आदिवासी सर्व समाजातील लोकांसाठी झडगड असतात, मायक्रो ओबीसी, एससी, एसटी यांचं प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आग्रही आहे. अनेक ठिकाणी मत मांडून होल्ड केले. साधारणपणे 9 ते 10 मतदारसंघात दुरुस्ती केली आहे. प्रत्येक पक्षाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार ठाकरे गट जागा मागत आहेत. आज रात्री 9 पर्यंत चित्र स्पष्ट होईल, आम्हाला विचारले तर महायुतीतही भांडण सुरू आहे. दरम्यान,  दिग्रस आणि दर्यापूरसह दोन तीन जागा अदला बदली नक्कीच होईल. राहुल गांधी समोर विषय झाला असून रामटेकचा निर्णय आज दुपरपर्यंत होईल. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. 

मुनगंटीवार यांचा समझोता प्रेमाने झाला की जबरदस्तीने?

आम्ही जोरगेवर भाजपमध्ये प्रवेश करेल याची वाट बघत होतो, जोरगेवर यांना आम्हाला घ्यायच नव्हतं, ते उमेदवार झाले तर काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल, मुनगंटीवार यांचा समझोता प्रेमाने झाला की जबरदस्तीने हे निकलानंतर स्पष्ट होईल. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. उद्या जाहीरनामा येईलच, आमचा पाच सूत्री कार्यक्रम आहे. दिवाळीची शुभ भेट ही असेल. सरकारकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू, नुसती फोकनाड बाजी नको. तेलंगणात भाजप लोकावर खोटी जाहिरात दिली म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. महालक्ष्मी योजना सुरू आहे. आमची गॅरंटी आल्यावर 31 ते 30 ला जाहीरनामा निघेल, महाराष्ट्र उभं करताना जाहीरनामा असणार आहे, पृथ्वीराज बाबा अध्यक्ष आहे. भाजपच्या जाहिरनाम्याची वाट बघत आहोत. त्यानंतर आम्ही आमचा जाहीरनामा आणू असेही ते म्हणाले.  

राज ठाकरे यांचा पक्ष मनसेच्या झेंड्यासोबत भूमिका बदलत असतो, त्यांची भूमिका ठरवू द्या. आत ते कुठल्या भूमिकेत आहे ते कळले नाही, कळल्यावर मी बोलेले असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 Superfast News :टॉप 60 सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 28 March 2025 : ABP Majha : 9 PmSantosh Deshmukh Case Update : देशमुख हत्या प्रकरण, आरोपी सुदर्शन घुलेने सांगितली संपूर्ण घटनाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 28 March 2025Job Majha : Agricultural Scientists Recruitment Board मध्ये नोकरीची संंधी, शैक्षणिक पात्रता काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
Small Savings Schemes : सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफसह इतर योजनांचे व्याज दर जाहीर, केंद्राचा मोठा निर्णय
सुकन्या समृद्धी योजनेसह इतर बचत योजनांचे व्याज दर जाहीर, सर्व व्याज दर एका क्लिकवर
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
Embed widget