एक्स्प्लोर

Vijay Wadettiwar: आरोपींची मंत्र्यांकडे उठबस, बिहारलाही लाजवेल अशीच बीडची परिस्थिती; विजय वडेट्टीवारांची घणाघाती टीका

Vijay Wadettiwar : सध्याचे बीड म्हणजे बिहारलाही लाजवेल अशीच बीडची परिस्थिती असल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Vijay Wadettiwar on Santosh Deshmukh Case : सर्वांर्थाने सक्षम असलेली आमची पोलीस यंत्रणा बीड प्रकरणात कुचकामी होताना दिसतेय, याचं फार वाईट वाटतंय. बीडच्या संदर्भात कुठल्याही दबावाला बळी न पडता या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे. तळापर्यंत जाऊन सर्व आरोपींचा शोध घेतला पाहिजे. मुळात या प्रकरणातील सर्व आरोपींची उठबस ही मंत्र्यांसोबत होती, असे अनेक पुरावे आहेत. त्यांच्यात जवळीक असून त्यांच्या घरात यांच्या वावर होता. हे सगळं होतं असताना ते आज म्हणताय की संबंध नव्हते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून सडकून टीका  केली आहे. 

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर ते नागपूर येथे बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी बीड म्हणजे बिहारलाही लाजवेल अशीच बीडची परिस्थिती असल्याची टीका ही त्यांनी केली आहे.

बीड म्हणजे बिहारलाही लाजवेल असेच बीडचे चित्र- विजय वडेट्टीवार 

बीड सारख्या जिल्ह्यात नेमणूक करणारे पोलीस हे तेथील मंत्र्यांच्या मर्जीने होतात. तिथे निर्णय घेणारे सर्व निर्णयकर्ते यांच्याच मर्जीने नेमले जातात. अनेक बीडचे अधिकारी जेव्हा आमच्याकडे चंद्रपूरला येतात तेव्हा ते सांगतात, की साहेब इतके काम करण्याची गरज नाही. 30-40 टक्के काम केलं तरी पुरे आहे. म्हणजे बीडमध्ये जो काही निधी मिळतो त्यातील निम्मे पैसे सर्व यंत्रणा आणि राजकीय नेते मिळून वाटप करून घेतात. म्हणून कॅगच्या अहवालात ही माहिती पुढे येते त्यात जवळपास 96 हजार कोटींची कामे मिळेनाच झाली आहे. यातील अधिकाधिक कामे ही एकट्या बीड जिह्यातील आहे. 20-30 टक्के टक्केवारी दिल्याशिवाय अवघ्या पाच लाखांचे कामही कोणी करू शकत नाही. म्हणजेच खंडणी, गुन्हेगारी आणि त्यातून अर्थकारण फिरतंय. हे सर्व पाहता बीड म्हणजे बिहारलाही लाजवेल अशीच बीडची परिस्थिती असल्याची घणाघाती टीका ही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1) जयराम चाटे, 2)महेश केदार 3) प्रतीक घुले आणि 4)विष्णू चाटे या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोन आरोपींना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता कृष्णा आंधळे हा एक आरोपी फरार आहेत. त्याच्या अटकेसाठी विशेष पथक मागावर आहे.

हे ही वाचा 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Embed widget