Rahul Gandhi: "राहुल गांधी आजोबा फिरोज खान यांच्या नावावर मतं का नाही मागत?"; भाजप नेत्याचा परखड सवाल
Uttar Pradesh Lok Sabha: राहुल गांधी त्यांच्या आजोबांच्या नावावर मतं का मागत नाहीत? असा सवाल भाजप नेत्यानं उपस्थित केला आहे.
Lok Sabha Election 2024: नवी दिल्ली : देशभरात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. अशातच एका भाजप (BJP) नेत्यानं राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर केलेल्या टीकेनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राहुल गांधी त्यांच्या आजोबांच्या नावावर मतं का मागत नाहीत? असा सवाल भाजप नेत्यानं उपस्थित केला आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रायबरेली येथील भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह (Dinesh Pratap Singh) यांनी राहुल गांधींवर जहरी टीका केली आहे.
उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांनी काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी आजोबांच्या नावावर मतं का मागत नाहीत? असा सवाल दिनेश प्रताप सिंह यांनी मतदानादरम्यान उपस्थित केला आहे.
दिनेश प्रताप सिंह यांनी सोमवारी (20 मे) "तुम्ही (राहुल गांधी) तुमचे आजोबा फिरोज खान यांच्या नावावर मतं का मागत नाहीत?" राहुल गांधी आजोबांचं नाव का घेत नाहीत?" असे प्रश्न उपस्थित केले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी रायबरेलीत भाजपचाच विजय होईल, असा दावाही केला आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यंदा केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती, मात्र अमेठीमध्ये त्यांचा स्मृती इराणी यांच्याकडून पराभव झाला होता. दोन्ही जागा गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानल्या जातात. आजच्या लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 14 जागांवर मतदान होत आहे.
महाराष्ट्रातील 13 जागांसह देशभरातील 49 जागांसाठी आज मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. देशातील एकूण 6 राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशात 49 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातला हा मतदानाचा शेवटचा टप्पा असेल. उत्तर प्रदेशच्या 14 जागांमध्ये मोहनलालगंज, लखनऊ, रायबरेली, अमेठी, जालौन, झाशी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, कौशांबी, बाराबंकी, फैजाबाद, कैसरगंज आणि गोंडा यांचा समावेश आहे.
पाहा व्हिडीओ : Amol Kirtikar Voting Mumbai North West : माझ्या वडिलांचा माझ्यासोबत आशीर्वाद कायम : अमोल कीर्तिकर
महत्त्वाच्या इतर बातम्या :