(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Unmesh Patil : भाजपकडून नाराज उन्मेश पाटलांच्या मनधरणीचा प्रयत्न, उद्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाची शक्यता; कोण आहेत उन्मेश पाटील?
Unmesh Patil : तिकीट कापलेले उन्मेश पाटील नाराज असल्याने ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याती शक्यता आहे. उद्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
Jalgaon Lok Sabha Election 2024 : उन्मेश पाटील (Unmesh Patil) उद्या ठाकरे गटात (Shiv Sena UBT) प्रवेश करण्याची शक्यता आहे. उन्मेश पाटील उद्या शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. उद्या दुपारी 12 वाजता मातोश्री हा पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. उन्मेश पाटील यांच्यासह पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवारही ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान जळगावमधून उन्मेश पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा यांचंही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे.
नाराज उन्मेश पाटील उन्मेश पाटील हातीशिवबंधन बांधणार?
उन्मेश पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर उद्धव ठाकरे, संजय राऊत, उन्मेष पाटील, करण पवार आणि संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. जळगावमधून उन्मेष पाटील किंवा करण पवार यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपकडून उन्मेश पाटलांच्या मनधरणीचा प्रयत्न
स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून उन्मेश पाटील नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. स्मिता वाघ यांचं नाव जाहीर झाल्यानंतर उन्मेश पाटलांनी पक्षाचा कार्यक्रम किंवा प्रचाराला उपस्थिती लावली नसल्याची माहिती आहे. भाजपकडून उन्मेश पाटील यांच्या मनधरणीचा प्रयत्न करण्यात येत असल्याचीही माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. पण, उन्मेश पाटील बुधवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधण्याची शक्यता आहे.
उद्या दुपारी 12 वाजता पक्षप्रवेश
उद्या दुपारी बारा वाजता शिवसेना ठाकरेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उन्मेष पाटील हे शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत पारोळा माजी नगराध्यक्ष करण पवार हे सुद्धा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
उन्मेश पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली
उन्मेष पाटील यांनी आज सकाळी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबईत 'सामना' इथे जाऊन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आणि त्यानंतर थेट मातोश्रीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली असल्याची माहिती आहे.
कोण आहेत उन्मेश पाटील?
उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजपचे खासदार आहेत. त्यांनी या आधी 2014 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली होती आणि ते चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आमदार होते. मात्र यावेळी उन्मेष पाटील यांना भाजपकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळता स्मिता वाघ यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांनी आज उद्धव ठाकरेंचं ठाकरे गटाचे नेत्यांची भेट घेतली.
जळगावात उमेदवारी मिळणार?
जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडी जरी मतदारसंघ ठाकरे गटासाठी सुटलेला असला तरी अद्याप कुठलाही उमेदवार दिला नाही. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते हर्षल माने, नुकत्याच भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या नेत्या ललिता पाटील आणि इतर काही इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत होती. मात्र, उन्मेष पाटील आणि करण पवार हे जर शिवसेना ठाकर प्रवेश करत असतील तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून नेमकी उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाकडून कोणाला मिळते ते पाहावे लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :