एक्स्प्लोर

Unmesh Patil : नाही म्हणताना वेदना होत आहेत, पण...; राऊतांच्या भेटीनंतर नाराज उन्मेश पाटीलांची प्रतिक्रिया

Jalgaon Lok Sabha Election 2024 : भाजपचे विद्यमान खासदार नाराज असल्याची चर्चा आहे. जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी खासदार संजय राऊतांची भेट घेतली.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असताना राजकारणात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहे. अनेक पक्षांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर तिकीट कापलेल्या उमेदवारांमध्ये नाराजीचं वातावरण असून राजीनाम्यांचं सत्र सुरु असल्याचं दिसून येत आहे.  भाजपचे विद्यमान खासदार नाराज असल्याची चर्चा आहे. जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी खासदार संजय राऊतांची भेट घेतली. यामुळे उन्मेश पाटील लवकरच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

उन्मेश पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला

जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी देत उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं. भाजपने विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उन्मेश पाटील लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत असताना मंगळवारी उन्मेश पाटील यांनी थेट मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे लवकरच उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असून त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.

नाराज भाजप खासदार ठाकरे गटाच्या वाटेवर

उन्मेश पाटील यांनी संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देत सांगितलं की, मैत्रिपूर्ण भेट होती. मी लवकरच यावर सविस्तरपणे बोलेन. आता काही बोलणे उचित नाही. संजय राऊत आणि आम्ही संसदेत एकत्र काम केलं आहे. राजकारणाच्या पलिकडे मैत्री जपावी लागते. आमची नेहमी चर्चा होत असते. प्रत्येक गोष्टीकडे राजकारण म्हणून बघू नका, असं उन्मेश पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

वेदना होत आहेत, पण : उन्मेश पाटील

उन्मेश पाटील संजय राऊतांच्या भांडुप येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आपल्या सर्वांचा मी मनापासून आदर करतो. आपले सगळे प्रश्न, आपल्या मनातील सगळे प्रश्न यावर मी सविस्तर आपल्याशी बोलेन. आता मला असं वाटतं की, मी आज बोलणं उचित नाही. तुम्हाला नाही म्हणताना वेदना होत आहेत. त्यामुळे मी आपल्यासोबत वेगळा संवाद साधेन. उद्या सकाळी यावर सविस्तर बोलेन, असं उन्मेश पाटील यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

राजकारणाच्या पलिकडे मैत्री जपली पाहिजे

मी आणि राऊत साहेबांनी संसदेच्या सभागृहात सोबत काम केलं आहे. राऊत साहेबांसोबत कायम चर्चा होत असते. त्या निमित्ताने मी आज संवाद साधण्यासाठी आलो आहे, प्रत्येक गोष्टीकडे आपण राजकारणाच्या दृष्टीने बघू नका. राजकारणाच्या पलिकडे मैत्री जपली पाहिजे, ती जपली जात नाही. राजकारणा पलिकडील मैत्री जपण्याचा हा प्रयत्न आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मोठी बातमी : तिकीट कापलेले भाजप खासदार थेट मातोश्रीवर, ठाकरे गटात प्रवेश करुन मैदानात उतरणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Embed widget