Ujjwal Nikam on Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणात उज्ज्वल निकम यांची उडी, सरकारकडे केली मोठी मागणी
Ujjwal Nikam on Pooja Khedkar : सनदी अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या अडचणी वाढतच जात आहेत. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर यूपीएससीने खेडकर (Pooja Khedkar) यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. खेडकर यांनी अनेक खोटी कागदपत्रे तयार करून नोकरी मिळवली आहे.
Ujjwal Nikam on Pooja Khedkar : सनदी अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या अडचणी वाढतच जात आहेत. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर यूपीएससीने खेडकर (Pooja Khedkar) यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. खेडकर यांनी अनेक खोटी कागदपत्रे तयार करून नोकरी मिळवली आहे, असा दावा केला जातोय. यामध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र, ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर करणे, असे अनेक आरोप खेडकर यांच्यावर करण्यात आले आहेत. खेडकर यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचीही अनेक प्रकरण समोर आली आहेत. दरम्यान, आरोपानंतर आता केंद्रीय मागासवर्ग आयोगही पूजा खडेकर (Pooja Khedkar) प्रकरणात लक्ष घालणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूजा खेडकर यांच्या जात प्रमाणपत्राची वैधता तपासली जाणार आहे. अशातच आता ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी पूजा खेडकर प्रकरणात सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
उज्ज्वल निकम काय काय म्हणाले?
उज्ज्वल निकम म्हणाले, या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय पातळीवर चौकशी सुरू आहे. परंतु, एक गोष्ट मात्र निश्चित आहे की या प्रकरणामुळे यूपीएससीने ज्या परीक्षा घेतल्या होत्या त्याच्याबद्दल लोकांच्या मनात एक शंका उपस्थित झालेली आहे. सरकारला निश्चितपणे याचे निराकरण करावे लागेल. कारण विशेषतः दिव्यांग्याचं खोटं प्रमाणपत्र घेतलं असेल आणि अशा खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ही परीक्षा पास होऊन त्याप्रमाणे काही सवलती प्राप्त करून काही नियुक्त्या केल्या असतील तर त्याची चौकशी या निमित्ताने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकरण गंभीर असून ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवलेले आहेत. त्यांच्याबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र यूपीएससीने याबाबतीत पारदर्शकपणे तातडीने चौकशी करून कायदेशीर निकाल देणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.
पूजा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. तुमचे केडर रद्द का करू नये, अशी विचारणा यूपीएससीने पूजा खेडकर यांच्याकडे केली आहे. तसेच यूपीएससीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे पुण्याच्या गुन्हे शाखेनेही पूजा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या