एक्स्प्लोर

मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची दुसरी उमेदवार यादी जाहीर

Uddhav Thackeray Shiv Sena candidate list : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आपली दुसरी उमदेवार यादी जाहीर केली आहे.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आपली दुसरी उमदेवार यादी जाहीर केली आहे.  कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली. महत्त्वाचं म्हणजे हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघात ठाकरेंनी उमेदवार मैदानात उतरवला आहे. सत्यजीत पाटील यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.  याआधी ठाकरे गटाने 17 जणांची उमेदवार यादी जाहीर केली होती.   

उत्तर मुंबई आम्ही मित्र पक्षाला विचारतोय आमच्याकडे उमेदवार आहेत पण मित्र पक्षाला विचारतोय, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. 

ठाकरेंची दुसरी उमेदवार यादी

  • कल्याण लोकसभा - वैशाली दरेकर 
  • हातकणंगले - सत्यजीत पाटील
  • पालघर - भारती कामडी
  • जळगाव - करण पवार 

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत राजू शेट्टी यांच्यासोबत बोलणी फिसकटली नाही. हातकणंगले आणि सांगली आम्ही लढात आहोत. हातकणंगले हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. तिकडचे राजकीय गणित पाहता आम्हाला कार्याकर्त्यांनी विनंती केली की आमचा उमेदवार द्यावा.  राजू शेट्टी यांना म्हटलं आम्ही पाठिंबा देऊ तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवा, त्यांनी नकार दिला, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

प्रकाश आंबेडकरांबाबत बोलणार नाही

प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला. मी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल काही बोलणार नाही. आमचे जुने ऋणानुबंध आहेत. यावेळेस जमलं नाही. पण ते हुकूमशाहीविरोधात एकत्र येतील असं वाटलं होतं. मी पूर्ण प्रयत्न केला, संविधान वाचविण्यासाठी एकत्र यावं. मी कार्याकर्त्यांना सांगितलं त्यांनी कितीही आरोप केला तरीही बोलू नका, अशा सूचना केल्या आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

भाजपचा विद्यमान खासदार ठाकरे गटात

दरम्यान, भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे शिवसेना ठाकरे गटात दाखल झाले आहेत. आजच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उन्मेश पाटील यांचं तिकीट भाजपने कापलं आहे. त्यामुळे उन्मेश पाटील यांनी थेट भाजपला रामराम ठोकून ठाकरे गटात प्रवेश केला.  त्यांना जळगावातून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ठाकरेंनी करण पवार यांना जळगावातून मैदानात उतरवलं आहे.

ठाकरे गटाची पहिली यादी

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 17 जणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये अनंत गिते, अनिल देसाई, अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, राजन विचारे, अमोल किर्तीकर यांची नावं होती.  

ठाकरे गटाची उमेदवार यादी  

बुलढाणा - नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख
मावळ - संजोग वाघेरे-पाटील
सांगली -चंद्रहार पाटील
हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
धाराशिव - ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
नाशिक - राजाभाई वाजे
रायगड - अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत
ठाणे - राजन विचारे
मुंबई-ईशान्य - संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण - अरविंद सावंत
मुंबई-वायव्य - अमोल कीर्तिकर
परभणी - संजय जाधव
मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई 

कल्याण लोकसभा - वैशाली दरेकर 

हातकणंगले - सत्यजीत पाटील

पालघर - भारती कामडी

जळगाव - करण पवार 

संबंधित बातम्या  

Shiv Sena UBT Canditates: शिवसेना ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
Embed widget