एक्स्प्लोर

Uddhav Thackeray on Eknath Shinde : आनंद दिघेंचं वाक्य होतं गद्दारांना क्षमा नाही, राजन विचारेंचा विजय गद्दारांचे डिपॅाझीट जप्त करुन होणार, ठाण्यात ठाकरेंचा निर्धार

Uddhav Thackeray on Eknath Shinde, Thane : गद्दारांना गाडलंच पाहिजे. गद्दारांना गाडा ही फक्त घोषणा असता कामा नये. ही शिवसेना ठाण्याची शिवसेना आहे. आनंद दिघेंचं वाक्य होतं की, गद्दारांना क्षमा नाही. चित्रपटाच्या निमित्ताने समोर आलं ते त्यांना स्वत:ला समजायला पाहिजे.

Uddhav Thackeray on Eknath Shinde, Thane : "गद्दारांना गाडलंच पाहिजे. गद्दारांना गाडा ही फक्त घोषणा असता कामा नये. ही शिवसेना ठाण्याची शिवसेना आहे. आनंद दिघेंचं वाक्य होतं की, गद्दारांना क्षमा नाही. चित्रपटाच्या निमित्ताने समोर आलं ते त्यांना स्वत:ला समजायला पाहिजे. ते आता ठाणेकर करुन दाखवणार आहेत. गद्दारांना क्षमा नाही. राजन विचारे निष्ठावंत शिवसैनिक आहे, राजन विचारेंनी स्टॅडिंग कमिटी सोडली नसती तर हे भूत जन्मालाच आले नसते. आनंद दिघेंचा मृत्यू झाला पण त्यांनी भगवा सोडला नाही. याला निष्ठा म्हणतात. गद्दारांना निष्ठा काय असते हे शिकवण्याची नाही तर दाखवण्याची वेळ आली आहे. मला खात्री आहे की, राजनचा विजय तर होणार आहेच. पण राजन विचारेंचा विजय गद्दारांचे डिपॉझिट करुन पाहिजे. फक्त गोंधळून जाऊ नका. धनुष्यबाण चोरांच्या हातात आहे",  असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह मोदी-शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. 

मोदीजी तुमच्या पराभवामुळे भारतात जल्लोष होणार आहे

उद्धव ठाकरे म्हणाले, मोदीजी तुमच्या पराभवामुळे भारतात जल्लोष होणार आहे. नवाब शरीफ यांच्या वाढदिवसाला केक खायला मोदी गेले होते. 10 वर्षात 56 इंच छाती 156 इंच झाली पाहिजे होती. जो कामाचा नाही. तो रामाचा कसा होईल? राम राज्य पाहिजे. तुम्ही काहीच काम केले नाही. 80 कोटी जनतेला तुम्ही जेवण देताय? आम्ही यांच्या हाताला काम देणार आहोत. मुस्लिम, ख्रिश्चन समाज आमच्या बरोबर येत आहे. एक वेळी लोक मोदी मोदी बोलायचे आता हुकूमशहा बोलत आहेत. हे सरकार गजनी सरकार.. काल काय बोललेले आज आठवत नाही. यांच्याकडे धुणीभांडी करणारा निवडणूक आयुक्त आहे. कोशारी तुमचा नोकर होता. त्याने छत्रपती , फुलेंचा अपमान केला. काही बोलले नाही? सुप्रिम कोर्टाने सांगितले कोशारी चुकीचे होते. मोदी तुम्ही सर्वेच्च न्यायालयावर दबाव आणताय. 

माझ्या मढवींना तुरुंगात टाकलं, मी उद्या यांना तुरुंगात टाकणार 

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, परभणीची सभा , कोल्हापूरची सभा, धाराशिवची सभा आणि सगळ्याच पाहा. धारशिवची जी सभा होती, अंगावरची रोमांच यावा, लाखो लोक आणि आपण आईचा गोंधळ घालतो. आई तुळजाभवानी गोंधळाला आली होती, असं त्या सभेचे स्वरुप होते. लोक पेटले आहेत, चिडले आहेत. कधी एकता मतदानाची तारिख येते आणि यांना रिटायर नाही तर गेटआऊट करण्याची लोक वाट पाहात आहेत. किती मस्ती आली आहे. एकतर यांच्यामध्ये समोरासमोर लढण्याची हिंमत नाही. माझा शिवसैनिक निष्ठावान आहेत. त्यांना म्हणतात ये सगळं सोडवून देतो. पण मढवी तुरुंगात आहेत. भाजपात किंवा मिंध्यांकडे जायला तयार आहे. यांना माझ्या मढवींना तुरुंगात टाकलं, मी उद्या यांना तुरुंगात टाकणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Uddhav Thackeray on Eknath Shinde : काही जणांना मस्ती आलीये, त्यांची मस्ती उतरवण्यासाठी आलोय, ठाण्यातून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर पहिला हल्ला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget