एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, विश्वासू शिलेदाराच्या खासदारकीवरील संकट टळलं

Uddhav Thackeray : मुंबई हायकोर्टाच्या एका निर्णयानं विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार खासदार अनिल देसाई यांच्या निवडीला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई  मतदारसंघातून राहुल शेवाळे यांचा पराभव केला होता.

खासदार अनिल देसाई यांच्या निवडीला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. अॅड. महेंद्र भिंगारदिवे यांनी देसाई यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी ही निवडणूक याचिका फेटाळून लावली.यामुळं अनिल देसाई यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

अॅड. महेंद्र भिंगारदिवे यांनी राईट टू रिकॉल पार्टी च्यावतीनं निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यांनी अनिल देसाई यांच्या उमेदवारीला आणि त्यांच्या उमेदवारीच्या कागदपत्रांना आव्हान दिलं होतं. अनिल देसाई यांची उमेदवारी अवैध ठरवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. देसाईंच्या अर्जातील काही रकाने रिक्त होते तर काही ठिकाणी स्टँम्प पेपरच्या मागील बाजूस स्वाक्षरी नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. अनिल देसाईंच्या शपथपत्रात अपुरी माहिती असल्याचं देखील ते म्हणाले होते. ही याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाल्यानंतर खासदार अनिल देसाई यांनी संबंधित निवडणूक याचिका फेटाळून लावण्यासाठी याचिका दाखल केली होती. 

अनिल देसाई यांच्यावतीनं देवदत्त कामत आणि अंकित लोहिया यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर निवडणूक याचिका फेटाळण्यात आली. 

राहुल शेवाळे यांचा पराभव करत अनिल देसाई लोकसभेत

लोकसभा निवडणूक लढवण्यापूर्वी अनिल देसाई हे शिवसेनेचे राज्यसभा खासदार होते. राज्यसभेची टर्म संपल्यानंतर त्यांना उद्धव ठाकरेंनी दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी दिली होती. महाविकास आघाडीची एकजूट अनिल देसाई यांना या मतदारसंघात फायदेशीर ठरली. अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांना पराभूत करत विजय मिळवला. अनिल देसाई यांना या लोकसभा मतदारसंघात 395138 मतं मिळाली होती. तर, राहुल शेवाळे यांना 341754 मतं मिळाली होती. अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा 53384 मतांनी पराभव केला होता. तर, याचिकाकर्ते अॅड. महेंद्र भिंगारदिवे यांना 1444 मतं मिळाली होती. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 9 खासदार लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. मुंबईत अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दीना पाटील हे तीन खासदार विजयी झाले होते. 

इतर बातम्या :

अकोल्यावरुन महायुतीत कलगीतुरा, विद्यमान आमदार भाजपचा, तर आगामी निवडणुकीसाठी मिटकरी, बाजोरियांनीही दावा ठोकला, तिढा वाढणार की सुटणार?

Maharashtra MLA List : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, जाणून घ्या महाराष्ट्रातील 288 विद्यमान आमदार कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा, स्वबळावर मनसेचं कधी किती बळ?Zero Hour  : जागावाटपाच्या चर्चेत शाहांचं वक्तव्य म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंवर दबावतंत्र?Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणूक : सुपरफास्ट बातम्या : 16 OCT 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
New Justice Statue : भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
Solaur vidhansabha : शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
Embed widget