(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यसभा निवडणुकीत छ. संभाजीराजेंचा अपमान कुणी केला? 2 व्हिडीओ दाखवत उदय सामंतांचा गौप्यस्फोट!
Uday Samant: उदय सामंत यांनी भर पत्रकार परिषदेत दोन व्हिडिओ दाखवून संभाजीराजेंचा अपमान कुणी केला, असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
कोल्हापूर : राज्यातील कोल्हापूरमध्ये यंदा छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे, कोल्हापूरच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) छत्रपती शाहू महाराज विरुद्ध शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात थेट लढत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उदय सामंत (Uday Samant) यांनी कोल्हापुरातून पत्रकार परिषद घेत, शिवसेना उबाठा नेतृत्वात गंभीर आरोप केले आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या गादीचा सन्मान आम्हीही राखतो. मात्र, गादीचा आता सन्मान राखतो असे म्हणणाऱ्यांनीच संभाजीराजे छत्रपतींना उमेदवारी नाकारल्याचा गौप्यस्फोट सामंत यांनी केला आहे. यावेळी, सामंत यांनी भर पत्रकार परिषदेत दोन व्हिडिओ दाखवून संभाजीराजेंचा अपमान कुणी केला, असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
संभाजीराजे हे ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत ते शिवसेनेचा (त्यावेळच्या) प्रचार करतील. संभाजीराजे यांनी केवळ शिवसेनेचा आदेश मानला पाहिजे, संभाजीराजे यांनी केवळ आणि केवळ शिवसेनेची (त्यावेळच्या) भूमिका मांडली पाहिजे. तसेच, संभाजीराजेंनी प्रेस घेऊन सांगितलं पाहिजे की शिवसेनेचे (त्यावेळच्या) नेते हे माझे नेते आहेत, असा ड्राफ्ट बनवण्यात आला होता. मात्र, संभाजीराजेंनी या ड्राफ्टमध्ये काही बदल सुचवले होते. मात्र, शेवटच्या बैठकीत, संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केला पाहिजे अशी अट घालण्यात आली होती, असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला. तर, मी जो ड्राफ्ट लिहिला तो एवढा मोठा होता की, कॉलेजनंतर पहिल्यांदाच मी एवढं लिखाण पानावर केलं असेल, असेही सामंत यांनी म्हटलं.
उद्योग मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद (कोल्हापूर) https://t.co/IwMp8kIE5M
— Uday Samant (@samant_uday) May 1, 2024
पत्रकार परिषदेतील मुद्दे
राजकारणात कशा पद्धतीने रंग बदलले जातात याचा पुरावा व्हिडीओसह दाखवणार आहे
संभाजीराजे यांना राज्यसभेची उमेदवारी मागे घेण्याबाबत काय झालं हे मी सांगणार आहे
राज्यसभेच्या सगळ्या घडामोडीतील मंत्री मीच होतो
जे आता संभाजीराजे आणि छत्रपती घराण्याविषयी पुळका दाखवतात त्यांनी काय केलं हे सांगतो
((संभाजीराजे यांचा व्हिडीओ प्ले केला))
दोन व्हिडीओ उदय सामंत यांनी दाखवले आहेत
जे शब्द संभाजीराजे बोलले नाहीत ते मी आता बोलतो
संभाजीराजे हे ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत ते शिवसेनेचा (( त्यावेळच्या)) प्रचार करतील
संभाजीराजे यांनी केवळ शिवसेनेचा (( त्यावेळच्या)) आदेश मानला पाहिजे
संभाजीराजे यांनी केवळ आणि केवळ शिवसेनेची (( त्यावेळच्या)) भूमिका मांडली पाहिजे
संभाजीराजे यांनी प्रेस घेऊन सांगितलं पाहिजे की शिवसेनेचे (( त्यावेळच्या)) नेते हे माझे नेते आहेत
मात्र यामध्ये संभाजीराजे यांनी काही बदल करायला सांगितले की मी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सांगेन
शिवाय गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करेन असं संभाजीराजे म्हणाले
जर मला उमेदवारी द्यायची असेल तर कोल्हापूरला येऊन द्या असं संभाजीराजे म्हणाले आणि बैठकीतून उठले
शेवटीच्या बैठकीत अचानक सांगितले की संभाजीराजे यांना शिवसेनेत (( त्यावेळच्या)) प्रवेश केला पाहिजे
हा मला आणि संभाजीराजे यांना सुद्धा धक्का होता
त्यामुळे सरड्यासारखे रंग बदलणारे आता छत्रपती घरण्याबद्दल पुळका दाखवत आहेत
(( त्यावेळच्या)) शिवसेनेनं संभाजीराजे यांना का खेळवून ठेवले याच उत्तर दिलं पाहिजे,
ज्यांनी संभाजीराजे यांचा अपमान केला त्यांनी छत्रपती घराण्याबद्दलचा आदर शिकवू नये
ज्या शाहू महाराज यांना भेटायला गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुलाचा कसा अपमान केला हे मी दाखवत आहे
हे सगळं प्रकरण झाल्यानंतर मी स्वतः संभाजीराजे यांची माफी मागितली होती
माझी प्रामाणिक इच्छा होती की संभाजीराजे हे खासदार व्हायला पाहिजेत
मला संभाजीराजे यांच्याबरोबर बोलण्यात गुंतवून ठेवले आणि इकडे संजय पवार यांना तिकीट दिलं
जर संभाजीराजे यांना आधीच सांगितलं असतं की संजय पवार यांना तिकीट देणार आहे तर संभाजीराजे यांचा अवमान झाला नसता
माझी नार्को टेस्ट करा, माझी प्रामाणिक इच्छा होती संभाजीराजे खासदार व्हावेत
मी चार वेळा सांगितलं होतं की संभाजीराजे यांच्याकडून असं लिहून घेऊ नये
पण मला ((त्यावेळच्या)) शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं की आपण उमेदवारी देतोय तर लिहून घ्यायला काय हरकत आहे
नरेंद्र मोदी यांनीच संभाजीराजे यांचं राज्यसभेवर पाठवण्याची शिफारस केली होती
शरद पवार यांनी त्यावेळी राजवर्धन कदमबांडे यांना वारसाच्या मुद्यावरून उमेदवारी दिली होती
शरद पवार यांनी त्यावेळी प्रचाराचा मुद्दा वारसदार हाच केला होता
----------------------------------
सीमाभागाच्या बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत
त्याठिकाणी सर्व सोयी सुविधा आणि तरुणांना नोकरी देण्याचं काम आम्ही करतोय
सीमाभागाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे
----------------------------------
शरद पवार साहेब यांना विनंती आहे की साताऱ्यात जे भाषण केलं तेच भाषण कोल्हापूरात करावं