या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
कोण जॅकेट शिवून असतं, कोण प्रार्थना करत असतं, हे सगळं ठीक आहे. पण, इव्हीएमने सरकारने निवडल्यानंतर पहिल्या शपथविधीला किती दिवस लागले
मुंबई : सरकारला बहुमत मिळून सुद्धा मंत्रीमंडळ स्थापन व्हायला इतका वेळ लागतोय. हा मतदारांचा अपमान नाही का ? काही जणं तर कोर्ट शिवून तयार होते, असे म्हणत शिवसेना युबीटी पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी, नाव न घेता त्यांनी आमदार भरत गोगावले यांच्यावर निशाणा देखील लगावला. तसेच, मंत्रिमंडळ विस्तारात (Ministry Expansion) आपण पाहिलतं तर बहुमत मिळूनही आता खात्यांसाठी वाद सुरू आहे, हे फार चुकीचं आहे, असेही आदित्य यांनी म्हटले. यावेळी, संसदेतील स्वातंत्र्यवीर सावरकर वादावर आणि दादरमधील हनुमान मंदिराच्या वादावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं.
कोण जॅकेट शिवून असतं, कोण प्रार्थना करत असतं, हे सगळं ठीक आहे. पण, इव्हीएमने सरकारने निवडल्यानंतर पहिल्या शपथविधीला किती दिवस लागले. आता भांडण आणि स्वार्थीपणा सुरू आहे, जो बाजूला ठेवून लोकांची सेवा करायला पाहिजे, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मंत्रिमंडळ विस्तावर पहिली प्रतिक्रिया दिली. इव्हीएमने आणि निवडणूक आयोगाने बहुमत दिलं आहे. लगेच कामाला लागायला पाहिजे होतं. पण, मला काय मिळणार, तुला काय मिळणार हा स्वार्थीपणा सध्या सुरू आहे. एवढ बहुमत मिळून देखील हे खुश नाहीत, कुठेही आनंद साजरा केला नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको
मुंबईतील रस्ते घोटाळ्याचे आरोप मी केले होते. याबाबत आता भाजपकडून चौकशीची मागणी होतं आहे. म्हणजे मी केलेले आरोप खरे आहेत. याप्रकरणी मूळात एकनाथ शिंदे, दिपक केसरकर, मंगलप्रभात लोढा यांची नावे आहेत. मुलांच्या गणवेशातही भ्रष्टाचार केलेला आहे यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळायला नको, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले. म्हणजेच एकनाथ शिंदेंसह तीन नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देऊ नका, असे आदित्य यांनी सूचवले आहे.
दोन्ही पक्षांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करावे
भाजप आणि काँग्रेस यांनी आता सावरकर आणि नेहरूंच्या मुद्द्यापेक्षा इतर विषयांवर प्रकाश टाकायला हवा. ५० वर्षांपूर्वी काय झाले, यापेक्षा सध्या बेरोजगार तरुणाच्या हाताला काम हे मुद्दे महत्वाचे आहेत, असे म्हणत सावरकर वादावरुन आदित्य ठाकरे यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना सल्ला दिलाय.
हनुमान मंदीर वादावरुन भाजपला टोला
भाजपचा बुरखा आम्ही काल फाडलेला आहे. दुसऱ्याच्या समाजाला दाबून आम्हाला आमचं हिंदुत्व सिद्ध करायचं नाही. आमचं हिंदुत्व वेगळ आहे, ह्रदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे. उद्धव ठाकरेंनी काल त्यांचा बुरखा फाडलेला आहे. निवडणुकांपुरतेच भाजपचं हिंदुत्व असतं, हे पून्हा एकदा सिद्ध झालं आहे.
हेही वाचा
होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया