दिल्लीत महिन्याभरात मोठी राजकीय उलाढाल होणार, शरद पवारांच्या हवाल्याने शेकापचे नेते जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट
दोन दिवसापूर्वी शरद पवार यांनी फोन करून दिल्लीत मोठी राजकीय घडामोड सुरु असून या महिन्यात ती होणार असल्याने आपण कार्यक्रमास येऊ शकत नसल्याचे पवार यांनी सांगितल्याचा हवाला भाई जयंत पाटील यांनी दिला.
![दिल्लीत महिन्याभरात मोठी राजकीय उलाढाल होणार, शरद पवारांच्या हवाल्याने शेकापचे नेते जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट There will be a big political Happening in Delhi within a month Says Shekap leader Jayant Patil quoting Sharad Pawar दिल्लीत महिन्याभरात मोठी राजकीय उलाढाल होणार, शरद पवारांच्या हवाल्याने शेकापचे नेते जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/02/cbde60feda357c7baf70039939c745bd172260051293089_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर: दिल्लीमध्ये या महिन्यामध्ये मोठी राजकीय उलाढाल होत असून त्यामुळे मी येऊ शकत नाही असा फोन शरद पवार यांनी केल्याचे सांगत शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठा गौप्यस्फोट केला . शेतकरी कामगार पक्षाच्या 19 व्या राष्ट्रीय अधिवेशनाला आज पंढरपूर येथे सुरुवात झाली यावेळी उदघाटन प्रसंगी भाई जयंत पाटील बोलत होते . या राष्ट्रीय अधिवेशनाला शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते मात्र त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याचे चर्चा सुरु असताना भाई जयंत पाटील यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला .
दोन दिवसापूर्वी शरद पवार यांनी फोन करून दिल्लीत मोठी राजकीय घडामोड सुरु असून या महिन्यात ती होणार असल्याने आपण कार्यक्रमास येऊ शकत नसल्याचे पवार यांनी सांगितल्याचा हवाला भाई जयंत पाटील यांनी दिला. आपण दिल्लीत सरकार पाडा मग या , आम्ही तुमचे स्वागत करू अशा शुभेच्छा आपण त्यांना दिल्याचेही भाई जयंत पाटील यांनी सांगितले. या अधिवेशनास माकपचे दीपंकर भट्टाचार्य यांच्यासह शेकापचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
एका महिन्यात मोठी राजकीय उलाढाल : जयंत पाटील
भाई जयंत पाटील म्हणाले, शरद पवारांनी मला फोन केला मला म्हणाले, माफ करा मी कार्यक्रमाला येऊ शकत नाही. मी दिल्लीला आहे एका महिन्यात मोठी राजकीय उलाढाल होत आहे. त्यामुळे मला जमणार नाही. मी बोललो तुम्ही सरकार पाडा आणि या आम्ही तुमचे स्वागत करु.
भाजप सरकार चार महिन्यातच बदलणार, जयंत पाटलांचा दावा
केंद्रातील भाजप सरकार चार महिन्यातच बदलणार आहे. त्यानंतर दिल्ली सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण जातील असे वक्तव्य देखील जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. केंद्रातील सरकार चार महिन्यात बदलणार आहे. दिल्लीतील सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण जातील पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे अनेक वर्षाचा कार्यकाळ दिल्लीत घालवला आहे. त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला महाराष्ट्राला होईल असेही ते म्हणाले होते.
हे ही वाचा :
विधानसभेचे मैदान हिंदुत्वावरून धुमशान? हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक होणार, संघ कार्यकर्त्यांसोबत देणार प्रचाराला धार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)