एक्स्प्लोर

विधानसभेचे मैदान हिंदुत्वावरून धुमशान? हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक होणार, संघ कार्यकर्त्यांसोबत देणार प्रचाराला धार

विधानसभा निवडणुकीत एकगठ्ठा  हिंदू मते आपल्या पारड्यात कशी पडतील यासाठी भाजपचा हा प्रयत्न असणार आहे.

मुंबई:  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Lok Sabha Election Result)  आता सर्वच राजकीय पक्षांना वेध  विधानसभा निवडणुकीचे लागले. विधानसभेसाठी  तयारी (Vidha Sabha Election)  देखील सर्व पक्षांनी सुरू केली आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील झडू लागल्या आहेत. यात सत्तेत असलेला भाजप देखील मागे राहिलेला नाही.  मात्र आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP)  खास रणनीती आखली आहे.  हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेहमीच आक्रमक असलेल्या भाजपाने आता हा मुद्दा अधिक तीव्र करण्याचा इरादा केलाय आणि यासाठी भाजपचे नेते मैदानात उतरले आहेत.  भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजपा आमदार नितेश राणे आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तर आता रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.  

नुकतीच भाजप नेते आणि संघाची एक बैठक मुंबईत पार पडली.  या बैठकीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कसे आक्रमक व्हायचे याचे धडेच भाजप नेत्यांना देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. लोकसभा निवडणुकीत अपयश मिळालेल्या भाजपचे विधानसभेसाठी नेमके काय असेल हिंदुत्वाचे कार्ड हे जाणून घेऊया.  

संघ आणि भाजपची नेमकी काय रणनीती ठरली आहे?

  • लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहादच्या मुद्द्यावर भाजप येत्या दोन महिन्यात अधिक आक्रमक होणार 
  • संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून हिंदुना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आणि बैठका घेणार 
  • धारावीतल्या अरविंद वैश्य याची हत्या आणि उरणमधील यशश्री शिंदे या तरुणीची हत्या हे दोन मुद्दे घेऊन रान पेटवणार
  • हिंदू मतदारांमध्ये जनजागृती करणार
  • मुंबईतल्या हिंदू मतदारांकडे जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न असणार

 एकीकडे भाजपाकडून हिंदू मतं मिळवण्यासाठी आखणी केली जात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे. खासदार संजय राऊत यांनी तर राजकारणासाठी भाजप हिंदुत्वाचा वापर करत असल्याची टीका केली आहे.

भाजपच्या या रणनीतीला हिंदू मतदार किती साथ देणार?

 लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुस्लीम मतदार उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले होते. यामुळे विधानसभा निवडणुकीत एकगठ्ठा  हिंदू मते आपल्या पारड्यात कशी पडतील यासाठी भाजपचा हा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे भाजपच्या या रणनीतीला हिंदू मतदार किती साथ देणार हे पाहणं तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा :

हर्षवर्धन पाटील 100 टक्के निवडणूक लढवणार, पण कसे लढतील ते आताच सांगणार नाही; अंकिता पाटलांचं वक्तव्य, इंदापुरात पहिली ठिणगी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाहीमध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Embed widget