Monsoon Session: 'भारत मंदीच्या सावटात अडकण्याचा प्रश्नच नाही', अर्थमंत्री सीतारामन यांची लोकसभेत माहिती
Nirmala Sitharaman In Lok Sabha: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे की, 'जगभरात महागाई वाढत आहे. कोरोनाचे संकट असूनही देश सुस्थितीत आहे.
Nirmala Sitharaman In Lok Sabha: आज लोकसभेत वाढत्या महागाईवर चर्चा झाली. यावरच बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे की, ''जगभरात महागाई वाढत आहे. कोरोनाचे संकट असूनही देश चांगल्या स्थितीत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महागाई रोखण्यासाठी वेळोवेळी पावले उचलली आहेत. अमेरिकेचा संदर्भ देत सीतारामन यांनी भारतात मंदीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले.''
यावेळी बोलताना त्यांनी भारताची तुलना पाकिस्तान आणि बांग्लादेश ऐवजी अमेरिकेशी केली. तसेच वाढती महागाई आणि जगासमोरील आव्हानांचा उल्लेख देखील त्यांनी आपल्या भाषणात केला. सीतारामन म्हणाल्या की, जगात काय चालले आहे, ते पाहावे लागेल. जगात भारताचे कोणते स्थान आहे? जगाला यापूर्वी कधीही अशा महामारीचा सामना करावा लागला नव्हता. महामारीतून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या स्तरावर काम करत आहे. म्हणूनच मी याचं श्रेय भारतातील जनतेला देते.