एक्स्प्लोर

MNS Vidarbha : आत्ताचे मनसेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या पसंतीचे, फेरबदलाचा प्रश्‍नच नाही!

एके काळचे विश्‍वासू हेमंत गडकरींना राज ठाकरे यांनी दौऱ्यात सोबत घेतले नाही. राज ठाकरेंची ही कृती म्हणजे गडकरींना समज आणि दिलेली संधी आहे, असे सांगण्यात येते.

Nagpur : राज्यातील सत्तांतरानंतर आगामी निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण (MNS Maharashtra) सेनेचा झेंडा फडकविण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विदर्भाचा दौरा केला. तसेच दौऱ्यादरम्यानच जुनी कार्यकारिणी बरखास्त केली होती. मंगळवारी मुंबईत नागपूर शहर व जिल्हाध्यक्षांच्या (Nagpur APPOINTMENT) नियुक्त्या घोषित केल्या. त्यानंतर या नियुक्त्यांवरून मतभेद उफाळून आल्याची चर्चा नागपुरात सुरू झाली. यात फेरबदल होण्याचे संकेतही काहींकडून देण्यात आले. पण नवीन कार्यकारिणी खुद्द राज ठाकरेंनी (Raj Thackeray) निवडली आहे. त्यामुळे त्यात फेरबदल होण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी 'एबीपी माझा'ला सांगितले.   

दुसऱ्याच दिवशी नियुक्त्यांवरुन वाद

राज ठाकरे यांनी विदर्भाचा दौरा केला. यामध्ये त्यांनी आधीची कार्यकारिणी बरखास्त केली. तशी घोषणा त्यांनी रवी भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत (Press conference) केलीच होती. त्याच वेळी घटस्थापनेनंतर नवीन कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी कार्यकारिणी जाहीर केली. मंगळवारी घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल बुधवारी नवीन नियुक्त्यांवरून (oppose to new appointments) वाद असल्याची चर्चा मनसेच्या गोटात सुरू झाली. त्यावर उंबरकर यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली आहे.

आगामी मनपा निवडणुकीसाठी सज्ज

सध्या विशाल बडगे आणि चंदू लाडे असे दोन शहरप्रमुख आणि नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून आदित्य दुरुगकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे सध्या दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. उर्वरित नियुक्त्या लवकरच (Remaining appointments soon) करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी मनसेचे प्रवक्ते (mns spokesperson) संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव पुढील महिन्यात नागपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात विदर्भातील आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेऊ, असे संदीप देशपांडे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले. 

हेमंत गडकरींना तूर्तास दिलासा

राज ठाकरे यांनी नागपूरमध्ये येऊन शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केली होती. या दरम्यान प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी (Hemant Gadkari) यांना हटवण्याची जोरदार मागणी विदर्भातील काही पदाधिकाऱ्यांनी केली होती.  राज ठाकरे यांचे विश्वासू म्हणून विदर्भाच्या दौऱ्यावर आलेले संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांना करण्यात आले होते. त्यांच्याच रिपोर्टवरून जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केली. मात्र राज ठाकरे यांनी हेमंत गडकरी यांना तूर्तास तरी कायम ठेवले आहे.  

गडकरी कायम तरी, दौऱ्यात सहभाग नाही?

राज ठाकरे यांनी हेमंत गडकरींना सध्या कायम ठेवले असले तरी नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीच्या दौऱ्यात त्यांना सहभागी करून घेतले नाही. या दौऱ्यात संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande), अविनाश जाधव, विठ्ठल लोखंडकार, राजू उंबरकर आदी त्यांच्या सोबत होते. पण एके काळचे विश्‍वासू हेमंत गडकरींना त्यांनी दोऱ्यात सोबत घेतले नाही. राज ठाकरेंची ही कृती म्हणजे गडकरींना समज आणि दिलेली संधी आहे, असे सांगण्यात येते.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nagpur News : वॉलीबॉल ज्युनियर प्रो लीगचा सोशल मीडियावर प्रचार, पण स्पर्धेच्या ठिकाणी कोणीच नाही, नागपूरात शेकडो खेळाडूंची फसवणूक

Nagpur News : वयापेक्षा मोठ्या तरुणीसोबत 'लिव्ह इन', दुसरीसोबत लग्नाची तयारी अन् कहानी में ट्विस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget