एक्स्प्लोर

Nagpur News : वॉलीबॉल ज्युनियर प्रो लीगचा सोशल मीडियावर प्रचार, पण स्पर्धेच्या ठिकाणी कोणीच नाही, नागपूरात शेकडो खेळाडूंची फसवणूक

Volleyball League Fraud : वॉलीबॉल ज्युनियर प्रो लीगच्या नावाखाली शेकडो खेळाडूंची फसवणूक झाल्याचा प्रकार नागपूरात घडला आहे. संबधित खेळाडूंनी प्रवेश फी देखील भरली असल्याने त्यांना आर्थिकदृष्ट्याही फटका बसला आहे.

Volleyball League Fraud in Nagpur : आपण बँकिंग आणि इतर ऑनलाईन व्यवहारांमध्ये फसवणुकीचे (Online Fraud) प्रकार नेहमीच ऐकत असतो. मात्र, आता ठगबाजांनी चक्क खेळाडूंनाच टार्गेट करत एकाच वेळी शेकडो वॉलीबॉलपटूंची फसवणूक केली आहे. वॉलीबॉल ज्युनियर प्रो लीगच्या नावाखाली नागपूरात ही फसवणूक (Volleyball League Fraud in Nagpur) करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर वॉलीबॉल ज्युनियर प्रो लीगच्या (Junior Volleyball League) ट्रायलची जाहिरात झळकत होती.  यावेळी प्रसिद्ध कबड्डी प्रो लीग सारखीच व्हॉलीबॉल प्रो लीग आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठीचे ट्रायल्स 25 सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे यशोदा हॉस्पिटल जवळच्या मैदानावर घेण्याचेही जाहिरातीत सांगण्यात आले.

अशाप्रकारच्या प्रो लीगमधून झटपट पैसा आणि झटपट प्रसिद्धी मिळेल, या आशेने राज्यभरातून शेकडो वॉलीबॉलपटूंनी ऑनलाईन नोंदणी केली. त्यासाठी प्रत्येक खेळाडूने 800 रुपये भरले. ट्रायल्सच्या दिवशी किट दिली जाईल असे सांगून अनेकांकडून अतिरिक्त पाच पाच हजार रुपये देखील घेण्यात आले. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया सह ठाणे, पुणे, सातारा, सांगली अशा अनेक जिल्ह्यातून तरुण वॉलीबॉलपटू नागपूरात दाखल झाले होते. मात्र, नियोजित ठिकाणी पोहोचल्यावर जाहिरातीत नमूद केलेल्या मैदानात अशा कोणत्याच प्रकारचे ट्रायल्स आयोजित करण्यात आलं नसल्याचं दिसून आलं. 

फसवणूक करणारी टोळी परप्रांतीय असल्याची शक्यता

खेळाडूंनी बराच तास वाटही पाहिली. त्यानंतर संबधित नंबरवर संपर्कही साधला, तेव्हा तो मोबाईल क्रमांक ही बंद आढळला. ज्यानंतर मात्र खेळाडूंना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस तक्रार दिली आहे. दरम्यान आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही. महाराष्ट्रातील तरुणांची फसवणूक करणारी ही मंडळी परप्रांतीय असल्याची माहितीही समोर येत आहे.  

रंगतदार, सांघिक खेळ 

एक अतिशय रंगतदार आणि भारतात बऱ्याच ठिकाणी खेळण्यात येणारा सांघिक खेळ म्हणजे वॉलीबॉल. या खेळात प्रत्येकी 6 खेळाडू असलेले दोन संघ उंच जाळी लावलेल्या कोर्टवर एकमेकांविरुद्ध आमने-सामने असतात. प्रत्येक संघ बॉल दुसऱ्या संघाच्या कोर्टमध्ये ढकलून टप्पा पाडण्याचा प्रयत्न करतो.मैदानाची लांबी 18 मीटर आणि रुंदी 9 मीटर असते.  १८९५ साली अमेरिकेमध्ये सुरु झालेला हा खेळ जगभरात खेळला जातो. समुद्रकिनारी सर्वाधिक खेळला जाणारा खेळ म्हणजे वॉलीबॉलच आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Embed widget