एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nagpur Winter Session : 32 वर्षाच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलंय : आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray in Nagpur Winter Session : "एका 32 वर्षाच्या तरुणाला खोके सरकार घाबरलंय. म्हणूनच बदनामीचे प्रयत्न होत आहेत," असं ठाकरे गटाचे आमदार आधित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात बोलत होते

Aaditya Thackeray in Nagpur Winter Session : "एका 32 वर्षाच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलं आहे, त्यामुळे बदनामीचे प्रयत्न सुरु आहेत," अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली आहे. नागपूरमधील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि रिया चक्रवर्तीच्या फोन कॉलमधील AU नावावरुन हिवाळी अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात केली. त्यानंतर आदित्य ठाकरे नागपुरात माध्यमांशी बोलत होते. 

'एका 32 वर्षाच्या तरुणाला खोके सरकार घाबरलंय'

आदित्य ठाकरे म्हणाले की, "एका 32 वर्षाच्या तरुणाला खोके सरकार घाबरलंय. म्हणूनच बदनामीचे प्रयत्न होत आहेत. जनतेला माहित आहे, आज हे गद्दार मुख्यमंत्री ज्या घोटाळा प्रकरणात अडकले आहेत, ते आम्हाला सभागृहात सादर करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी पक्ष हे सतत वेलमध्ये येत आहे आणि अध्यक्ष, तालिका अध्यक्ष आम्हाला बोलू देत नाहीत. त्या बाजूला 14 जणांना बोलू दिलं, तेही एकापाठोपाठ. अडीच वर्षात मी तरी असं हाऊस सुरु असल्याचं पाहिलं नाही. मी लहानपणापासून टीव्हीवर अधिवेशन पाहिलंय. पण सत्ताधारी पक्ष वेलमध्ये येऊ आंदोलन करतोय, असं कधीच दिसलं नाही." 

"यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राज्यपाल हटाओ आम्ही जी सातत्याने मागणी करत आहोत, ज्या महाराष्ट्रद्वेशी राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला. महाराष्ट्राच्या विधीमंडळाचा अपमान केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. महात्मा फुलेंचा अपमान केला. त्यांना वाचवण्यासाठी हा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जे काही शोधायचंय ते शोधू द्यात. महत्त्वाची गोष्ट एकच आहे की, NIT चा घोटाळा आम्हाला सभागृहात सादर करु न देण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत," असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

नाव घेण्याची हिम्मत नाहीये यांच्यात, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या काही लोकांकडे मी लक्ष देत नाही. पण जसं मी सांगितलं की, एका 32 वर्षांच्या तरुणाने एका खोके सरकारला हलवून ठेवलंय, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

'राज्यातील राजकारण घाणेरडं कधीच नव्हतं'

दिशा सालियान प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे. त्यासंदर्भात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "मला या प्रकरणात एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. जी व्यक्ती आता हयात नाही. त्या व्यक्तीचे आई-वडील टीव्हीसमोर रडले, त्यांचं दुःख त्यांनी व्यक्त केलं. त्यांनी राष्ट्रपतींना सुरु असलेल्या घाणेरड्या राजकारणाबाबत लिहिलेलं आहे. काही आमदारांनी त्यांच्याबाबत वक्तव्य केलं त्यांचीही बदनामी करण्यात आली. आपलं राजकारण एवढं घाणेरडं कधीच नव्हतं. तिच्या आई-वडिलांनी विनंती करुन देखील, तसेच त्यांनी राष्ट्रपतींकडेही मागणी केली आहे की, आमची होणारी बदनामी थांबली नाहीतर आम्ही जगू शकणार नाही."

"पुन्हा गोष्ट तीच येते की, राजकारणाला घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी काहीच पातळी उरलेली नाही का? आपल्या विधानभवनात कधीच असं घाणेरड्या प्रकाराचं राजकारण झालं नव्हतं, जे आज दिसतंय." असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Embed widget