Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंनी नाक घासून माफी मागितली तरी आता सुट्टी नाही; सुषमा अंधारे कडाडल्या, काय काय म्हणाल्या?
Sushma Andhare On Neelam Gorhe: सुषमा अंधारेंनी निलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करणार आहे.

Sushma Andhare On Neelam Gorhe: ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप काल (23 फेब्रुवारी) शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला होता. नीलम गोऱ्हेंच्या या विधानानंतर महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच सुषमा अंधारेंनी निलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करणार आहे.
नीलम गोऱ्हेंना ज्या पक्षानी चार वेळा आमदारकी दिली. त्यांनी त्यांच्या मॉडेल कॉलनीतील भागात शिवसेनेची एक साधी शाखाही उघडली नाही. त्यांनी माझा शिवसेनेत पक्षप्रवेश होऊ दिला नाही. माझा पक्षप्रवेश होईपर्यंत नीलम गोऱ्हेंच्या कानावर पडू दिलं नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. तसेच पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा हे सगळं काम नीलम गोऱ्हे बघायच्या...नीलम गोऱ्हेंनी आमदारकीसाठी मर्सिडीज दिल्या तर त्या कुठून आणल्या? नीलम गोऱ्हेंचा व्यवसाय काय, की त्यांची अडीचशे कोटींची संपत्ती आहे?, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना एसएफआयमधून केली. त्यानंतर भारिपमध्ये उडी मारली. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे त्यांना ओळख मिळाली. ईमानदारी, प्रामाणिकपणा त्यांच्या शब्दकोशात नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांनी बेइमानी केली. शरद पवारांकडे आणि त्यांच्या पक्षाशी बेईमानी केली मग त्या आमच्याकडे आल्या. त्या जिथे राहतात त्यांनी एक शाखा उभी केली नाही, लोकांना कसे बाजूला ठेवता येईल हे त्यांनी केलं, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
2017 ते 2022 पर्यंत त्यांनी माझा पक्षात प्रवेश होऊ दिला नाही- सुषमा अंधारे
2017 ते 2022 पर्यंत त्यांनी माझा पक्षात प्रवेश होऊ दिला नाही, असा आरोपही सुषमा अंधारेंनी केला. 2 मर्सिडीज दिल्या असं म्हणत असतील तर त्यांनी त्यांच्या 2 मर्सिडीज कुठून आणल्या? त्यांचा कुठली मालमत्ता आहे जी 250 करोड ची आहे. त्याची मालमत्ता आता तपासावी लागेल, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. गोऱ्हे यांच्यासारखा व्यक्तीला पैशाची कदर नाही. त्यांनी अनेक पदं भूषवली म्हणजे अनेक मर्सिडीजचे किंमत त्यात होती. मी आज नीलम गोऱ्हेंवर हा अब्रू नुकसानीचा दावा किती असेल, त्याची रक्कम किती असेल हे संध्याकाळपर्यंत कळवले जाईल, असंही सुषमा अंधारेंनी सांगितले. एकनाथ शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनाच माहिती असेल की कलेक्शन किती होतं. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे म्हणणे कोर्टात सादर करावे. नाहीतर नाक घासून माफी मागितली तरी आमचा लढा असणारच, असंही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं. नीलम गोऱ्हे यांनी कर्तृत्व नसताना अनेक पदं भूषवली. मला वेळ आणू नका, भारिपमध्ये असताना तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांनी काय काय केलं, मला या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील, असा इशारा देखील सुषमा अंधारे यांनी दिला.
संबंधित बातमी:
गोऱ्हेंनी नाक घासून माफी मागितली तरीही आमचा लढा असणारच :अंधारे, VIDEO:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

