सुरेश धस रात्री उशीरा अंतरवालीत, उपचार घेण्याचा धरला आग्रह, जरांगेंशी काय चर्चा केली?
मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी रात्री उशिरा भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट दिली.
Jalna: एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात उडी घेत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली .अंतरवली सराटीत येत या उपोषणाला संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात रान उठवणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी रात्री उशिरा ( 28 जानेवारी) मनोज जरांगे यांची भेट घेतली . यावेळी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करत त्यांना उपचार घेऊन सलाईन लावण्याचा आग्रह धरला . कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला मुदतवाढ,आंदोलकांवर गुन्हे आणि जिल्हा व तालुका स्तरावर कुणबी नोंदी शोधण्यासाठी कक्ष स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचेही धस यांनी जरांगेंना सांगितलं . (Jalna)
रात्री उशिरा झालेल्या या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास संमती दर्शवली असून शुगर लेवल डाऊन झाल्याने आणि अशक्तपणा आल्याने डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार करण्यात आले . (Antarvali Sarati)
धस -जरांगेंच्या रात्री झालेल्या भेटीत काय चर्चा ?
मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी रात्री उशिरा भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट दिली .यावेळी त्यांनी मनोज रंगे यांना उपचार घेऊन सलाईन लावण्याचा आग्रह धरला .मनोज तरंगे यांच्या काही मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे धस यांनी जरंग यांना सांगितलं .शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्यासाठी मुदतवाढ तसेच आंदोलकांवरील गुन्हे आणि कुणबी नोंदणीच्या शोधासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर कक्ष स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाल्याचं आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांना सांगितलं .दरम्यान आपण पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे येणार असल्याचे देखील ते म्हणाले .
सातव्यांदा आंदोलनाला बसले, तब्येत खालावली
गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी अंतरवली सराटीत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे .मनोज जरंगे पाटील हे सातव्यांदा आंदोलनाला बसले आहेत .दरम्यान आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली होती . शुगर लेवल डाऊन झाल्याने तसेच अशक्तपणा जाणवत असल्याने कार्यकर्त्यांकडून मनोज जरांगे यांनी उपचार घ्यावे अशी विनंती केली जात होती .
संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत लढणार
संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, यासाठी सुद्धा आपण लढायचे आहे. यातील सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा करण्याची मागणी आपण या आंदोलनात केली आहे. संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत आपण लढणार आहोत. सरकारने मराठ्यांच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करा. मराठ्यांच्या मागणीशी मुख्यमंत्री गद्दारी करणार नाहीत, असे त्यांनी म्हटले.
हेही वाचा: