Revati Sule: आईसाठी लेकीची बुलंद कहाणी; चुलता, भाचा, पुतण्यानंतर आता सुप्रिया सुळेंची लेक सुद्धा प्रचारात सक्रिय
Revati Sule: यंदाच्या निवडणुकीत पवार कुटुंबातील लेकी- सुनांच्या उमेदवारीची चर्चा असताना सुप्रिया यांना पवार कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळताना दिसतोय
पुणे : बारामतीत (Baramati Lok Sabha ) आईच्या प्रचारासाठी आला रेवती सुळे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतेय. रेवती सुळेंकडून बारामतीत सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू आहे. अजित पवारांचे (Ajit Pawar) सख्खे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आणि आणि रेवती सुळे (Revati Sule) बारामतीत झालेल्या पदयात्रेत सहभागी झाली होते. यंदाच्या निवडणुकीत पवार कुटुंबातील लेकी- सुनांच्या उमेदवारीची चर्चा असताना सुप्रिया यांना पवार कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळताना दिसतोय
युगेंद्र पवार म्हणाले, लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. सगळे बाहेर पडले आनंद आहे. या निवडणुकीत पहिल्यांदा रेवती फिरत आहे. आमचे विचार वेगळे असू शकतात पण आमच्यात भांडण नाही. पदाधिकारी आणि पुढारी नसले तरी सर्वसामान्य जनता आमच्यासोबत आहे. लवकरच सुप्रिया सुळेंचा मुलगा विजय सुळे देखील प्रचारात सहभागी होणार आहे.
दादांची सगळीच वक्तव्ये गंभीर घ्यायची नसतात: पुतण्या युगेंद्र पवार
अजित पवारांच्या आमदारीची स्वप्ने पडत असल्याच्या वक्तव्यावर अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार म्हणाले, मला आमदारकीची स्वप्नं पडत नाही माझ्या मनात देखील आलं नाही. सध्या मी प्रचार करत नाही. अजून मी आमदारकीचा विचार केला नाही. याचा गंभीरपणे विचार केला नाही. विचार करेल आणि घरातील सगळ्यांशी चर्चा करुन निर्णय घेईल. दादा सहज बोलून गेले. दादांची सगळीच वक्तव्ये गंभीर घ्यायची नसतात.
शरद पवारांची सख्खी नातवंडे अद्याप राजकीय आखाड्यापासून दूर
परिवारात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय सु्प्रिया सुळेंच्या मागे ठामपणे उभे आहे. पुतणे, भाचे, चुलते, सगळे सुप्रिया सुळेंचा जोरदार प्रचार करत आहे. आता सुप्रिया सुळेंचा मुलगा आणि लेक देखील सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे यांची दोन्ही मुलं म्हणजेच लेक रेवती व मुलगा विजय हे सुद्धा आईच्या प्रचारासाठी सहभागी होणार आहेत. पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्याप्रमाणे शरद पवारांची सख्खी नातवंडे अद्याप राजकीय आखाड्यापासून दूर असल्याने त्यांचे फारसे दर्शन घडत नाही.
बारामती कोणाची होणार?
राज्याच्या प्रमुख नेत्यांचं लक्ष बारामती काबीज कऱण्यासाठी लागलं आहे. नणंद भावजय जरी उमेदवारी घेऊन निवणडणुकीच्या रिंगणात उतरल्या असल्या तरीही खरी लढाई ही काका- पुतण्यांमध्ये होणार आहे. त्यामुळे बारामती नेमकी कोणत्या पवारांची होणार?, हे पाहणं महत्वाचं ठरलं आहे.