(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunil Raut on Ashish Shelar : मोदी 10 वर्षात जग फिरुन आले, पण उद्धवसाहेब लंडनला गेले तर यांच्या पोटात दुखतय, सुनील राऊतांचा आशिष शेलारांवर हल्लाबोल
Sunil Raut on Ashish Shelar, Mumbai : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबईतील पश्चिम उपनगरातील नालेसफाईची पाहाणी केली. आज शेलार यांनी मुंबईतील नालेसफाईचा तिसऱ्यांदा आढावा घेतला.
Sunil Raut on Ashish Shelar, Mumbai : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबईतील पश्चिम उपनगरातील नालेसफाईची पाहाणी केली. आज शेलार यांनी मुंबईतील नालेसफाईचा तिसऱ्यांदा आढावा घेतला. दरम्यान, यावेळी नालेसफाई समाधानकारक झाली नसल्याचे नमूद करत आशिष शेलारांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कुठे आहेत? लंडनच्या नालेसफाईची पाहाणी करायला गेले आहेत ? असा सवाल आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला होता. दरम्यान, आशिष शेलारांच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले सुनील राऊत ?
नरेंद्र मोदी दहा वर्षांमध्ये शंभर जग फिरून आले. त्यावेळी ते काय करायला गेले होते. उद्धव साहेब लंडनला गेले तर त्यांच्या पोटामध्ये दुखत आहे. मोदी वर्षातून पन्नास वेळा जात आहेत. मोदी यांना आशिष शेलार काय सल्ला देणार आहे. त्यांना देखील योग्य सल्ला द्या. हा देश आपला आहे ते जगभर फिरत आहेत. त्यांनी जे काय प्रॉमिस केले आहे? ज्या बाबींची मोदींनी गॅरेंटी दिलेले आहे. ते सगळं पूर्ण करा. मग आम्हाला विचारा मी उद्धव ठाकरे लंडनला गेले. की ते कुठे गेले, असं सुनील राऊत यांनी म्हटलं आहे.
तुम्ही चोरून आणलेले आमदार किती दिवस राहतील ही शंका आहे
पुढे बोलताना सुनील राऊत म्हणाले, हे संपूर्ण जगात जाऊन फिरतात तेव्हा आम्ही ऑब्जेक्शन घेतो का? ते काय घरात जाऊन बसतात का ? पहिले तुम्ही तुमच्या पंतप्रधानाला सल्ला द्या नंतर आम्हाला सल्ला द्या. वर्षावर बसून काम होत नाही. ज्यावेळी उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी जगभरात त्यांचा नंबर होता. यांचा कितवा नंबर आहे ते त्यांना विचारा. काम करण्यासाठी डोक्याची गरज असते, नुसते बसून काम होत नाही. तुम्ही 400 पार होऊ शकत नाही. तुम्ही चोरून आणलेले आमदार किती दिवस राहतील ही शंका आहे, असंही सुनील राऊत यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या