Sunil Tatkare on Supriya Sule : अपघाताला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणतात म्हणजे सुप्रिया सुळेंना बारामतीचा पराभव दिसतोय, सुनील तटकरेंचा हल्लाबोल
Sunil Tatkare on Supriya Sule, मुंबई : पुण्यात आणि नागपूरला घडलेल्या घटना गंभीर आहेत. यावर कारवाई करायलाच हवी. माञ अपघताच्या घटनेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणणं म्हणजे बारामतीच्या पराभवाच चित्रं सुप्रिया सुळेंना समोर दिसत आहे.
Sunil Tatkare on Supriya Sule, मुंबई : "पुण्यात आणि नागपूरला घडलेल्या घटना गंभीर आहेत. यावर कारवाई करायलाच हवी. माञ अपघताच्या घटनेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणणं म्हणजे बारामतीच्या पराभवाच चित्रं सुप्रिया सुळेंना समोर दिसत आहे. निवडणुकीचा पराजय समोरं दिसत असल्याने हे आरोप होतं आहेत. फेर मतदानाची मागणी 15 दिवसानंतर करत आहेत यावरून स्पष्ट होतंय की पराजय समोर दिसत आहे", असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुनील तटकरे बोलत होते.
संघटन मजबूत करणं यावर आम्ही लक्ष देत आहोत
सुनील तटकरे म्हणाले, जनतेचा कौल आम्हाला मिळेल. 27 तारखेला आम्ही मुंबईत गरवारे क्लबला मीटिंग आयोजित केली आहे. सर्व पदाधिकारी या बैठकीला असतील. एकच लक्ष विधानसभा क्षेत्र आमच्या समोर असणार आहे. संघटन मजबूत करणं यावर आम्ही लक्ष देत आहोत. 10 जूनला तारखेला वर्धापनदिन मुंबई आणि दिल्लीला साजरा केला जाणार आहे. लवकरच एक महत्त्वाचा पक्ष प्रवेश होणार आहे. लवकरच महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहितीही सुनील तटकरे यांनी दिली.
महायुतीचा माध्यमातून अनेक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला
पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, राज्यांत 60 टाक्याच्या आसपास मतदान झाले आहे. महायुतीचा माध्यमातून अनेक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. देशाच भवितव्य ठरवणारी निवडणूका आहेत. या कळतं विरोधकांकडून जी भाषा वापरण्यात आली ती चुकीची आहे. विरोधी पक्षातील प्रमुखांनी ही भाषा वापरली. जनतेचा मोठा प्रतिसाद आम्हाला आहे, असं तटकरे यांनी नमूद केलं.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय - सुप्रिया सुळे
दोन तरुणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलामुळे अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांच्या पालकांची अवस्था पाहिलीत का? याची जबाबदारी कोण घेणार? माझा आरोप आहे की हा मोठा गुन्हा आहे. ज्याने केला असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मात्र देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत असं म्हणाले की पोलिसांनी राजकीय दबावाखाली दबलं जाऊ नये. राजकीय दबाव कुणी टाकला? याचं उत्तर मिळालं पाहिजे. राजकीय दबाव टाकला गेला हे सरकारनेच मान्य केलं आहे. त्यामुळे माझ्या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. शिवाय राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या