अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बोलल्या, म्हणाल्या...
Sunetra Pawar on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबतच्या चर्चेवर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
Sunetra Pawar on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबतच्या चर्चेवर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. "आपण सगळे पाहात आहात मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत आहोत. अजितदांदांनी (Ajit Pawar) मोदी साहेबांना साथ द्यायची, असं ठरवलय. सर्वांना मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी आपण काम करत आहोत. अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, अशी सर्वांची इच्छा आहे. सगळ्यांची इच्छा पूर्ण होऊ दे असं साकडं घातलं आहे", असं बारामतीच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) म्हणाल्या. त्या पुण्यातील सभेत बोलत होत्या.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) म्हणाल्या, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. सर्वांना सुखी ठेवा, स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करा, असं सांगितलं. आज शिवजयंती निमित्त इथे येण्याचा योग आला. आज मी महाराजांच्या चरणी वंदन करते. भोर, वेल्हा, विकास झालेला आहे तो दादांच्या (Ajit Pawar) मार्फत विकास झालेला आहे, असं लोक म्हणत असतात.
रयतेचे राज्य खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांमुळे मिळाले
बाबासाहेब पुरंदरे यांनी ही शिवसृष्टी उभारली. 21 व्या शतकात आहोत, पण 17 व्या शतकात आहोत असं वाटतंय, पावन झाल्या सारखं वाटलं. स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांना मी अभिवादन करते. रयतेचे राज्य खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांमुळे मिळाले. महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असेल. एक जुटिने काम करूया, असं आवाहनही सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी यावेळी बोलताना केले.
सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार
सुनेत्रा पवार यांचे नाव बारमती लोकसभा लढवण्यासाठी चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यापूर्वी अनेकादा स्पष्ट केले आहे की, महायुतीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आमच्या वाट्याला आला तर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाईल. दरम्यान गेल्या महिन्याभरापासून सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण बारामती मतदारसंघ पिंजून काढलाय. त्यांनी जनसंपर्क अभियान गावभेटी सुरु केल्या आहेत. यामधून त्या लोकांना अजित पवार यांनी केलेल्या विकास कामांची माहिती देताना दिसत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या