एक्स्प्लोर

बारामतीत सुनेत्रा पवार, बीडमध्ये पंकजा मुंडे, परभणीतून मी जिंकणार, काळ्या दगडावरील पांढरी रेष; महादेव जानकरांनी सांगितला महायुतीचा आकडा

राज्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये मी 55 सभा घेतल्या. त्यावेळी, राज्यातील निवडणुकांमध्ये मला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल सहानुभूती दिसली.

परभणी : राज्यातील 48 मतदारसंघातील लोकसभा निवडणुकांसाठी 5 व्या टप्प्यात मुंबईसह 13 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. त्यामुळे, राज्यातील 48 उमेदवारांचे (Loksabha) भवितव्य मतपेटीत बंद झाले असून आता गावागावात 4 जूनच्या निकालाचीच प्रतिक्षा आहे. गावखेड्यात, चौकाचौकात, प्रवासात आणि पार्ट्यांमध्येही 4 जूनचीच चर्चा होत आहे. गावपातळीवर कोणता उमेदवार निवडून येणार यावरुन मोठ्या पैजाही लागल्याचं दिसून येत आहे. तर, महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेतेही आपल्याच जागा सर्वाधिक येणार असल्याचा दावा करत आहेत. त्यातच, राज्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बारामती आणि बीड (Beed) लोकसभा मतदारसंघाबाबत रासपचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर (mahadeo jankar) यांनी भाकीत केलं आहे. तर, परभणी लोकसभा मतदारसंघातून आपलाच विजय होणार असल्याचा दावाही महादेव जानकर यांनी केला आहे. 

राज्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये मी 55 सभा घेतल्या. त्यावेळी, राज्यातील निवडणुकांमध्ये मला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल सहानुभूती दिसली. मात्र, तरीसुद्धा महायुतीच्या 42 जागा निवडून येणार आहेत, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केलाय. विशेष म्हणजे, बीड आणि परभणीमध्ये ओबीसी व मराठा वाद जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. महाविकास आघाडीने खतपाणी घालून हा वाद केल्याचा आरोपही जानकर यांनी केला आहे. जानकर यांनी नाव न घेता मनोज जरांगे यांच्याकडे बोट दाखवले आहे. बीड आणि परभणीत सर्वात जास्त कोण फिरलं हेही बघायला पाहिजे, कुठल्याही एका जातीवर राजकारण करणं हे चुकीचं आहे, असे जानकर यांनी म्हटले. मात्र, काहीही झालं तरी बीडमध्ये पंकजा मुंडे आणि परभणीतून मीच निवडून येणार असल्याचा दावाही जानकरांनी केलाय.   

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार, बीडमधून पंकजा मुंडे आणि परभणीतून मी निवडून येणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे महादेव जानकर यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. तसेच, महायुतीला राज्यात 42 जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे, आता महादेव जानकरांचा हा विश्वास जिंकतो की त्यांचा हा आत्मविश्वास अतिशयोक्ती ठरतो हे 4 जून रोजीच कळणार आहे. दरम्यान, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत झाली असून महादेव जानकर यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचारही केला होता. तर, पंकजा मुंडेंना ते आपली बहिण मानतात.

बीड, परभणीत जातीय गणितं दिसली

दरम्यान, बीड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत जातीय राजकारण झाल्याचं पाहायला मिळालं. बीडमध्ये मुंडे बहिण-भावाने थेट जातीय राजकारणावर प्रहार केला. बीडमध्ये यापूर्वी कधीच असं जातीय राजकारण झालं नसल्याचंही त्यांनी आपल्या जाहीर भाषणातून सांगितलं. मात्र, मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं केंद्रस्थान असल्याने बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद दिसून आला. त्यातच, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंगण सोनवणे हे मराठा समाजाचे असल्याने मराठा विरुद्ध ओबीसी असे ध्रुवीकरणही येथे पाहायला मिळाले. तर, परभणीतही शिवसेनेचे संजय बंडू जाधव विरुद्ध महादेव जानकर यांच्या लढतीतही जातीय समीकरण दिसून आले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळी कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळी कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
Gold Rate : सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Top 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 29 नोव्हेंबर 2025
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळी कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळी कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
Gold Rate : सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Kolhapur News:  नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
कोल्हापूर : नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं; जळगावात भाजप अन् शिवसेनेत जुंपली, नेते आमने-सामने
भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं; जळगावात भाजप अन् शिवसेनेत जुंपली, नेते आमने-सामने
Nanded Crime: जातीय विखारातून वडिलांनी प्रियकराला संपवलं, प्रेयसीने मृतदेहाशी लग्न केलं, अंगाला हळद अन् कपाळावर कुंकू भरलं
जातीय विखारातून वडिलांनी प्रियकराला संपवलं, प्रेयसीने मृतदेहाशी लग्न केलं, अंगाला हळद अन् कपाळावर कुंकू भरलं
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
Embed widget