एक्स्प्लोर

Sujay Vikhe : राज्यातले सारे भिकारी शिर्डीत, साई मंदिरातील प्रसादालयातलं जेवण बंद करा, सुजय विखेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Shirdi News : शिर्डीतील साईबाबा संस्थानने (Sai Baba Mandir)  मोफत जेवण बंद करावं आणि हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे,  अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलीय.

शिर्डी : शिर्डीतील साईबाबा संस्थानने (Sai Baba Mandir)  मोफत जेवण बंद करावं आणि हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे,  अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलीय. प्रसंगी यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा इशाराही सुजय विखे यांनी दिलाय. शिर्डीतील (Shirdi News) साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांना मोफत भेजन देत आहे. मात्र यामुळे शिर्डीत भिकार्‍यांची संख्या वाढली असून मोफत जेवण बंद करावं आणि  मुलांच्या भविष्यासाठी हा पैसा खर्च केला जावा, अशी अपेक्षा ही माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलीय.

'तो' खर्च मुला- मुलींच्या भविष्यासाठी खर्च करा-सुजय विखे

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबा देशभरातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरम्यान, साई संस्थानाच्या प्रसादालयातलं मोफत जेवण बंद करा. अशी मागणी माजी खासदार सुजय विखेंची साई संस्थान प्रशासनाकडे केली आहे. जे पैसे अन्नदानात जातात ते पैसे आमच्या मुला- मुलींच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावा अशी मागणी सुजय विखेंनी केली आहे. अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय, महाराष्टातील सगळे भिकारी इथे गोळा झालेत, हे योग्य नाही. असेही सुजय विखे म्हणालेत. 

इंग्लिश विषय शिकवणाऱ्यालाच इंग्रजी येत नाही

आम्हाला आंदोलनाची वेळ आली तरी चालेल यासाठी आम्ही आंदोलन करू असा इशारा सुजय विखेंनी साई संस्थानला दिला आहे. शिर्डीत कोट्यवधी रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारण्यात आलं. मात्र चांगले शिक्षक तेथे नाही. इंग्लिश विषय शिकवणाऱ्यालाच इंग्रजी येत नाही. इंग्लिश विषयाचा शिक्षक मराठीत इंग्लिश शिकवतोय, याचा काय उपयोग? असे म्हणत सुजय विखेंनी साई संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील शिक्षकांवर ताशेरे ओढले आहेत. शिर्डीतील शिर्डी परिक्रमा उद्धोषणा कार्यक्रमात सुजय विखे पाटलांची भोजनालयात दर आकारावे अशी मागणी केली आहे. तर यावर निर्णय झाला नाही आणि आंदोलनाची वेळ आली तर आंदोलन करू. असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

वेळीच सुजय विखे पाटलांनी माफी मागावी- अक्षयमहाराज भोसले

शिर्डीत शिक्षणासंदर्भात काही अडचणी असतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निश्चित मदत करतील. मात्र आलेल्या भाविकांना मोफत प्रसाद वाटप करु नये, याउलट भिकारी असे संबोधन करने हे दुर्दैवी आहे. कारण अन्नदान क्षेत्रात सर्वसामान्य सगळेच प्रसाद घेत असतात. असे म्हणत शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी सुजय विखे पाटलांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भूतकाळात शिर्डीमध्ये साईबाबांना कोणी पळीभर तेल दिले नव्हतं. आता पुन्हा तशीच भावना लोकांमध्ये निर्माण होऊ नये, वेळीच सुजय विखे पाटलांनी माफी मागावी. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पावशेर दारू पिऊन धनंजय मुंडेंना अपमानित करण्याचे धाडस दाखवाल तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर जोरदार पलटवार
पावशेर दारू पिऊन धनंजय मुंडेंना अपमानित करण्याचे धाडस दाखवाल तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर जोरदार पलटवार
Anjali Damania : देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा, जयंत पाटील म्हणाले, त्यांना थांबवणं..
लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा, जयंत पाटील म्हणाले, त्यांना थांबवणं..
Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजेAnjali Damania PC : SIT, CID चौकशी धूळफेक; अंजली दमानिया यांचा हल्लाबोलLaxman Hake On Manoj Jarange : जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगू नको, नाही तर..Manoj Jarange News : तुमचा खून झाल्यावर आम्ही मोर्चा काढणार नाही का? धनंजय मुंडेंना घडवून आणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पावशेर दारू पिऊन धनंजय मुंडेंना अपमानित करण्याचे धाडस दाखवाल तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर जोरदार पलटवार
पावशेर दारू पिऊन धनंजय मुंडेंना अपमानित करण्याचे धाडस दाखवाल तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर जोरदार पलटवार
Anjali Damania : देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा, जयंत पाटील म्हणाले, त्यांना थांबवणं..
लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा, जयंत पाटील म्हणाले, त्यांना थांबवणं..
Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Nashik Crime News : नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
Embed widget