Sudhir Mungantiwar: वरिष्ठांकडून तो निरोप अन् चंद्रशेखर बावनकुळेंची हिंट; मंत्रिमंडळातून पत्ता कट, सुधीर मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट
Sudhir Mungantiwar On Maharashtra Cabinet Expansion: आतापर्यंत सांस्कृतिक आणि वनखातं सांभाळलेल्या सुधीर मुनगंटीवारांचा नव्या फडणवीस सरकारमध्ये पत्ता कट झाला.
Sudhir Mungantiwar Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर (Maharashtra Cabinet Expansion) भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त केली. यामध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) या दिग्गजांचा समावेश आहे.
आतापर्यंत सांस्कृतिक आणि वनखातं सांभाळलेल्या सुधीर मुनगंटीवारांचा नव्या फडणवीस सरकारमध्ये पत्ता कट झाला. त्यानंतर मुनगंटीवारांनी विधानसभा अधिवेशनाकडे पाठ फिरवत आपली नाराजी दाखवून दिली. सुधीर मुनगंटीवार सोबतच भाजपमधील अनेक नेत्यांच्या नाराजीची चर्चा होती. अशात, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय. आज सुधीर मुनगंटीवार विधानभवनात येतील, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार आज नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
सुधीर मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट-
एबीपी माझाशी प्रतिक्रिया देताना आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. त्यानंतर दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतल्यानंतर सुधीर मुनगंटीवार कॅमेऱ्यासमोर आले. आपण नाराज नाही असं ते कॅमेऱ्यासमोर बोलत होते, तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र लपून राहिले नाहीत. नाराजी लपवण्यासाठी सुधीर मुनगंटीवारांनी केलेला प्रयत्न कुणाच्याही नजरेतून सुटला नाही. नितीन गडकरींच्या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी एक गौप्यस्फोट केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही आपलं नाव मंत्रिपदाच्या यादीत असल्याचं सांगितलं होतं, असा दावा केला. पण वरिष्ठांकडून निरोप आला तर यादीतली चार-पाच लोक कमी होतील, अशी हिंटही चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली होती. मात्र असे काही घडले आहे असे वाटत नाही..., असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
आता मंत्रिपदाचा बोज उतरलाय- सुधीर मुनगंटीवार
आज देवेंद्र फडणवीस यांच्याशी कुठलेही बोलणं झालेलं नाही. काल सकाळी त्यांच्याशी बोलणं झालं होतं. मात्र प्रदीर्घ बोलणं कालही झालं नव्हतं. देवेंद्र फडणवीस यांची भेट नंतर घेऊ, आता एवढी काही घाई नाही. आता मंत्रिपदाचा बोज उतरलाय.. मला काही आनंद तर घेऊ द्या...काही भेटी गाठी राहिल्या आहे, ते घेऊ द्या...माझे क्षण परत तर येऊ द्या...नितीन गडकरी माझे मार्गदर्शकच आहेत. त्यांना भेटून चर्चा करण्यात काहीही गैर नाही. ते माझ्या मोठ्या भावासारखे राहिले आहेत, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.