Sudhir Mungantiwar : दोन भावांनी एकत्र यावं, एकत्र रहावे, आवश्यकता असेल तर दोन्ही पक्षाचे एक पक्ष करावा; भाजपच्या बड्या नेत्याचं ठाकरे बंधुना सूचना
Sudhir Mungantiwar: दोघे भाऊ एकत्र यावे, एकत्र रहावे शिवाय आवश्यकता असेल तर दोन्ही पक्षाचा एक पक्ष करावा, अशी सूचना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.

Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally मुंबई: संपूर्ण राज्यासह देशाल ज्याची उत्सुकता लागली आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) आज मुंबईत होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज वरळीत होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर येणार आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तोफ वरळी डोममधून आज धडाडणार आहेत. दरम्यान या विजयी मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधु राजकीय दृष्ट्या नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणे देखील अतिशय महत्वाचे ठरणार आहे.
अशातच, ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया आली असून राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोघे बंधु एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे. त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. दोघे भाऊ एकत्र यावे, एकत्र रहावे शिवाय आवश्यकता असेल तर दोन्ही पक्षाचा एक पक्ष करावा, अशी सूचना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) यांनी दिल्या आहेत.
गैरसमज का पसरवला गेला हे मला अजून कळालं नाही- सुधीर मुनगंटीवार
मराठी विषयावर दूरपर्यंत कोणतही राजकारण झालं नाही. हा गैरसमज का पसरवला गेला हे मला अजून कळालं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक समिती नियुक्त करण्यात आली. त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषा पाचवीनंतर सक्तीची आहे. पहिलीपासून मराठी व इंग्रजी सक्तीची होती. त्यासोबत बालवयात तिसरी भाषा सहज शिकता येते म्हणून अशी शिफारस उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेल्या समितीने केली. मराठी इंग्रजीसोबत हिंदी पहिल्या वर्गापासून शिकविल्या गेली तर ती सहज शिकता येते याच्यात मराठीचा काय संबंध आहे. असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
...तर आपण त्यांच्यासोबत जायचं नाही, अशी काँग्रेसची भूमिका
मराठी माणसांनी इंग्रजी शिकणे अभिमान, पण मराठी माणसांनी हिंदी शिकणे म्हणजे मराठीचा अवमान हे अजून मला समजलं नाही. कदाचित अजून 50 ते 100 पुस्तक वाचल्यावर लक्षात येईल. मी चॅनलवरून ऐकलं आहे की हे दोन्ही बंधू सोबत आले तर आपण त्यांच्यासोबत जायचं नाही, अशी काँग्रेसची भूमिका आहे. या मुद्द्याचा निवडणुकीत किती फायदा होईल यापेक्षा अशा वातावरणात राज्यात कारण नसताना गैरसमज कसे पसरतील हे अधिक महत्त्वाचं आहे. असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
























