(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sudhir Mungantiwar : कारण सांगून नापास होणारे विद्यार्थी म्हणजे महाविकास आघाडी; सुधीर मुनगंटीवारांचा मिश्किल टोला
Sudhir Mungantiwar : महाविकास आघाडीने वाट लावण्याचे काम मध्यंतरी केलं. कारण सांगून नापास होणारे विद्यार्थी म्हणजे महाविकास आघाडी आहे. असे टोला लगावत सुधीर मुनगंटीवारांनी मविआवर तोफ डागली आहे.
Maharashtra Politics नागपूर : आगामी विधानसभेसाठी (VidhanSabha Election 2024) भाजपची (BJP) यादी जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान राज्यात 150 ते 160 जागांवर भाजप लढण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत भाजपच्या उमेदवारांचा नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अशातच आज (सोमवारी) महाराष्ट्र भाजपच्या यादीवर दिल्लीतील भाजप नेतृत्वासोबत चर्चा होणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र भाजपचे महत्त्वाचे नेते आज दिल्लीला रवाना होणार. यावर भाष्य करताना भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आपली प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) निशाणा साधाला आहे.
आगामी निवडणुकीचे विश्लेषण आणि तयारीच्या अनुषंगाने बैठका होत राहतील. मात्र, महाविकास आघाडीने वाट लावण्याचे काम मध्यंतरी केलं. कारण सांगून नापास होणारे विद्यार्थी म्हणजे महाविकास आघाडी आहे. असे टोला लगावत सुधीर मुनगंटीवारांनी मविआवर तोफ डागली आहे. महायुती सरकार आणण्यासाठी ताकदीने जागा लढवता येईल, त्या संदर्भात निर्णय होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सूक्ष्म नियोजन असतं. हरियाणामध्ये भाजप हरत आहे असे सगळे सांगत असताना हरियाणा जिंकून येत आहे, हे अमीत शाह यांनी पहिले सांगितलं होतं. तर आता महायुतीचा विजय व्हावा यासाठी आम्ही विजयादशमी नंतर कामाला लागलो आहोत. असेही ते म्हणाले.
यातून सिद्ध होते की महायुती श्रेष्ठ आहे
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण, यावर एक मत होत नाही, त्यांच्यात प्रचंड भांडण आहे. महायुतीने केल्यानंतर चाटायच काम महाविकास आघाडी करते का? असं कुठलं कारण देण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते करत आहे. त्यातून सिद्ध होते की महायुती श्रेष्ठ आहे, जनतेने समजून घ्यावे, आमच्या निर्णयाशिवाय महाविकास आघाडी निर्णय घेऊ शकत नाही. असा घाणाघातही मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी मविआ वर केला आहे. तसेच मी निवडणूक आयोग नसल्याने आचारसंहिता केव्हा लागेल हे सांगू शकत नाही. आम्ही वर्षभर नियमित काम करत असतो. नियमित कामात कुठल्याही बदल होत नाही. आचारसंहितेच्या काळात फक्त उद्घाटन, भूमिपूजन आणि निर्णय घेऊ शकत नाही एवढेच. त्यामुळे त्याचा फरक पडत नाही. असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात आचार संहिता लागण्याच्या बाबत केले आहे.
टोल माफीचा चांगला निर्णय आहे. हा विकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी डिझेल, पेट्रोलवर जास्त कर लावला होता. महायुतीच्या सरकारने त्यातून सुटका केली. असे मत व्यक्त करत राज्य सरकारने मुंबईतील पाच टोल नाक्याच्या टोल माफी संदर्भात घेतलेल्या निर्णयावर व्यक्त केले आहे.
हे ही वाचा