एक्स्प्लोर

मोठी बातमी! दक्षिण मुंबईच्या जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच; आता माघार कोण घेणार?

Lok Sabha Seat Sharing : विशेष म्हणजे दोनही पक्षातील महत्वाच्या नेत्यांच्या बैठकांनंतर देखील दक्षिण मुंबईच्या जागेवर तोडगा निघू शकला नसल्याचे चित्र आहे. 

Lok Sabha Seat Sharing : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) जागावाटपाचा महायुतीमधील (Mahayuti Seat Sharing) तिढा सुटत नसल्याचे चित्र आहे. अशातच दक्षिण मुंबई लोकसभेच्या (South Mumbai Lok Sabha) जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये (Shiv Sena - BJP ) रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईची जागा भाजपसाठी (BJP) सोडण्याचा आग्रह भाजप नेत्यांकडून केला जात आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेकडून मात्र जागा सोडण्यास नकार दिला जात आहे. विशेष म्हणजे दोनही पक्षातील महत्वाच्या नेत्यांच्या बैठकांनंतर देखील दक्षिण मुंबईच्या जागेवर तोडगा निघू शकला नसल्याचे चित्र आहे. 

मागील काही दिवसांपासून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय बनला आहे. कारण महायुतीत भाजप आणि शिवसेना दोनही पक्षाकडून या मतदारसंघावर दावा केला जातोय. मोदी फॅक्टरमुळे भाजप दक्षिण मुंबई सहज जिंकेल असे भाजपचे मत आहे. त्यामुळे उमेदवार कुणीही असो, मात्र निवडणूक कमळावर लढवली पाहिजे असे भाजप व संघ कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कारण कमळ चिन्हावर हा मतदारसंघ जिंकण्याची शक्यता अधिक असल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र, शिवसेना हा मतदारसंघ भाजपला सोडायला तयार नाही. 

शिवसेनेकडून मिलिंद देवरा, तर भाजपकडून राहुल नार्वेकर इच्छुक...

भाजप शिवसेना युतीमध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ सेनेकडे राहिला आहे. गेल्यावेळी अरविंद सावंत येथून निवडून आले होते. मात्र, अरविंद सावंत हे ठाकरे गटात आहेत. असे असलं तरीही हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून, येथून आपलाच उमेदवार देण्याची भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. तर, शिंदे गटाच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा व यशवंत जाधव लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा हे काँग्रेसचा हात सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. दुसरीकडे भाजपकडून राहुल नार्वेकर व मंगल प्रभात लोढा यांची नावे चर्चेत आहेत. 

दक्षिण मुंबईसाठी भाजपचा हट्ट का? 

  • विधानसभेत युती नसताना झालेल्या स्वतंत्र लढतीत भाजपने शिवसेनेहून अधिक मते घेतली होती.
  • दक्षिण मुंबईत सध्या शिंदेच्या शिवसेनेसोबत केवळ एक आमदार असून, दोन आमदार ठाकरे गटाकडे आहेत.
    याउलट भाजपचे दोन आमदार कार्यरत आहेत.
  • गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत यंदा जबरदस्त मोदी लाट दिसेल, त्यामुळे भाजपसाठी दक्षिण मुंबईत पोषक वातावरण असेल असे भाजपचे मत आहे.
  • विशेषतः महिला व तरूणांवर असलेले नरेंद्र मोदींचे गारुड पाहता धनुष्यबाणाहून अधिक मते कमळाला मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
  • हे सर्व पाहता दक्षिण मुंबईत शिवसेनेला उमेदवार द्यायचा असेल, तर तो कमळ चिन्हावर द्यावा, अशीही चाचपणी महायुतीत सुरु आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Loksabha Seat Sharing : जागावाटपावरून महायुतीत गडबड, भांडण; भविष्यात फारच भयानक परिस्थिती, असं थेटच कोण बोललं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget